Delhi Mansoon: दिल्लीत पाणीच पाणी; ८८ वर्षांचा रेकॉर्ड तुटला!

212
Delhi Mansoon: दिल्लीत पाणीच पाणी; ८८ वर्षांचा रेकॉर्ड तुटला!
Delhi Mansoon: दिल्लीत पाणीच पाणी; ८८ वर्षांचा रेकॉर्ड तुटला!

दिल्लीमध्ये शुक्रवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर एवढा होता की, मागील ८८ वर्षांचा जुना रेकॉर्ड तुटला आहे. यामुळे भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले आहे. यामुळे दिल्लीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे.  (Delhi Mansoon)

(हेही वाचा – Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : मंदिरांचे धन बँकेत जमा करण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरा; गिरीश शहांचे प्रतिपादन)

मुसळधार पावसामुळे दिल्लीत ऑफिसला जाणारी नोकरदार मंडळी आणि इतर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यादरम्यान, इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल-१ (Delhi IGI Airport Tarminal 1) च्या पार्किंगचं छप्पर कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर लुटियन्स झोनमधील खासदारांच्या निवासस्थानामध्येही पाणी भरलं. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडे वाहतुकीबाबतच्या समस्यांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन (New Delhi Railway Station) परिसरात पाणी भरल्याने प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. काही ठिकाणी मेट्रो स्टेशन परिसरातही पाणी तुंबल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. (Delhi Mansoon)

(हेही वाचा – Budget Session 2024 : शिवरायांना अपेक्षित रयतेचं राज्य व कल्याणकारी संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प – सुधीर मुनगंटीवार)

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, रिंग रोडवर धौला कुआँ फ्लायओव्हरखाली नारायणा ते मोतीबागेच्या दिशेने दोन्हीकडे वाहतूक संथावली होती. तर आझाद मार्केट अंडरपासमध्ये वीर बंदा बैरागी मार्गावरही वाहतुकीची समस्या निर्माण झाली असून मथुरा रोडवर आश्रमपासून बदरपूरकडे जाणाऱ्या मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. तर रोहिणी येथे एक कार रस्ता खचून आत अडकली. (Delhi Mansoon)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.