T20 World Cup, Ind vs SA : राहुल द्रविडला शेवटच्या सामन्यात संघाकडून हवं आहे विजयाची गिफ्ट

T20 World Cup, Ind vs SA : टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना हा भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा संघाबरोबरचा शेवटचा सामना असेल 

122
T20 World Cup, Ind vs SA : राहुल द्रविडला शेवटच्या सामन्यात संघाकडून हवं आहे विजयाची गिफ्ट
T20 World Cup, Ind vs SA : राहुल द्रविडला शेवटच्या सामन्यात संघाकडून हवं आहे विजयाची गिफ्ट
  • ऋजुता लुकतुके 

मागच्या एका वर्षात भारतीय संघ खेळत असलेला हा आयसीसी स्पर्धेचा तिसरा अंतिम सामना आहे. या सामन्याची धाकधुक असली तरी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी संघाच्या या कामगिरीकडेही लोकांचं लक्ष वेधलं आहे. ‘आता आमची रणनीती यशस्वी झाली, खेळाडूंनी चांगला खेळ केला आणि दैवाने साथ दिली, तर अंतिम फेरी जिंकण्याची कामगिरीही आम्ही करू शकू,’ असं राहुल द्रविड आपल्या शेवटच्या सामन्यापूर्वी म्हणत आहेत. (T20 World Cup, Ind vs SA)

गेल्यावर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये मायदेशातच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत अपराजित होता. निर्विवाद वर्चस्व राखून जिंकत होता. पण, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चित्र पालटलं. ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून तो सामना जिंकला. आता राहुल द्रविड (Rahul Dravid) निकालाचा विचार करत नाहीत. ते रणनीती, खेळाडूंची तयारी या त्यांच्या हातात असलेल्या गोष्टी बोलतात. (T20 World Cup, Ind vs SA)

(हेही वाचा- UGC NET, CSIR-UGC NET परीक्षांच्या नव्या तारखा NTAकडून जाहीर, कधी होणार परीक्षा ? जाणून घ्यावा…)

‘आम्ही मागची ३ वर्षं अत्यंत सातत्यपूर्ण क्रिकेट खेळत आहोत. क्रिकेटच्या तीनही प्रकारात आम्ही अंतिम फेरी गाठली आहे. आता चांगला खेळ केला आणि खेळपट्टीनेही साथ दिली तर आम्ही अंतिम सामना जिंकूनही दाखवू,’ असं द्रविड पीटीआयशी बोलताना म्हणाले. (T20 World Cup, Ind vs SA)

भारतीय संघाला उपान्त्य सामना आणि अंतिम सामन्यांच्या मध्ये फक्त २४ तास मिळाले. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी मानसिक तयारीसाठी संघाकडे वेळच नव्हता. पण, त्याची काळजी द्रविड यांना वाटत नाही. ‘मध्ये एकच दिवस मिळालाय. त्यामुळे सराव आम्ही नक्कीच करणार नाही. पण, सगळे खेळाडू मानसिक, शारीरिक आणि रणनीतीच्या बाबतीतही अंतिम सामन्यात एकत्र आले पाहिजेत, इतकाच विचार आम्ही केलाय,’ असं द्रविड (Rahul Dravid) यांनी बोलून दाखवलंय. (T20 World Cup, Ind vs SA)

(हेही वाचा- Suraj Nikam: ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमची आत्महत्या; कुस्ती क्षेत्रावर शोककळा)

यापूर्वी भारतीय संघ याच मैदानावर अफगाणिस्तान विरुद्ध खेळलेला आहे. तेव्हा कठीण खेळपट्टीवरही भारताने १८१ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून आताही द्रविड यांना तीच अपेक्षा आहे. पहिली फलंदाजी घेऊन मोठी धावसंख्या रचणं हे भारताचं ध्येय असेल. (T20 World Cup, Ind vs SA)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.