UGC NET, CSIR-UGC NET परीक्षांच्या नव्या तारखा NTAकडून जाहीर, कधी होणार परीक्षा ? जाणून घ्यावा…

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं होतं की, पेपर डार्कनेटवर लीक झाले होते आणि टेलिग्रामवर शेअर केले जात होते.

137
UGC NET, CSIR-UGC NET परीक्षांच्या नव्या तारखा NTAकडून जाहीर, कधी होणार परीक्षा ? जाणून घ्यावा...
UGC NET, CSIR-UGC NET परीक्षांच्या नव्या तारखा NTAकडून जाहीर, कधी होणार परीक्षा ? जाणून घ्यावा...

विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अनियमितता झाल्यावरून वाद निर्माण झाला असताना एनटीएने (National Testing Agency) (NTA) शुक्रवारी, (२८ जून) रात्री UGC-NET परीक्षेसाठीची नवी तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे रद्द आणि पुढे ढकलण्यात आलेली UGC-NET परीक्षा आता २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत होणार आहे. संयुक्त CSIR UGC NET परीक्षा २५ जुलै ते २७ जुलैदरम्यान घेण्यात येईल. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं होतं की, पेपर डार्कनेटवर लीक झाले होते आणि टेलिग्रामवर शेअर केले जात होते. UGC-NET परीक्षा याआधी १८ जून रोजी घेण्यात येणार होती; पण एक दिवस आधी शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परीक्षांचे पेपर लीक झाल्याच्या संशयावरून मंत्रालयाने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता.

(हेही वाचा – Pune Accident: पुण्यात अल्पवयीन मुलाने टँकर चालवला, पती-पत्नीसह अनेकांना उडवलं; कशी घडली घटना? वाचा सविस्तर… )

परीक्षांमधील अनियमिततेवरून वाद
सध्या देशात नीट, नेट परीक्षांमधील अनियमिततेवरून वाद सुरू आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. संसदेत सुद्धा याचे पडसाद उमटल्याचं दिसत आहे. अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. एकंदरीत पेपरफुटीचं प्रकरण देशभरात गाजत आहे. १८ जूनला होणारी नेट परीक्षा ३१७ शहरांमध्ये होणार होती. यासाठी ९ लाख विद्यार्थी परीक्षा देणार होते; पण अचानक एक दिवस आधी परीक्षा रद्द झाल्याने त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.