T20 World Cup, Kapil on Bumrah : बुमराह माझ्यापेक्षा १००० पट चांगला, असं कपिल देव का म्हणतात?

T20 World Cup, Kapil on Bumrah : पीटीआय व्हीडिओला दिलेल्या मुलाखतीत कपिल यांनी ही भावना व्यक्त केली आहे

115
T20 World Cup, Kapil on Bumrah : बुमराह माझ्यापेक्षा १००० पट चांगला, असं कपिल देव का म्हणतात?
T20 World Cup, Kapil on Bumrah : बुमराह माझ्यापेक्षा १००० पट चांगला, असं कपिल देव का म्हणतात?
  • ऋजुता लुकतुके 

भारतातील तेज गोलंदाज जेव्हा तेज नाही तर मध्यमगती गोलंदाज होते, तेव्हा कपिल देव आणि मनोज प्रभाकर (Manoj Prabhakar) यांनी भारतीय गोलंदाजीची धुरा वाहिली. कपिल तर गरिबीतून मोठे झाले, हातात दगड घेऊन गोलंदाजीचा सराव केला. हरयाणाच्या रणजी संघात स्थान मिळवलं. ४३४ कसोटी बळी मिळवून कसोटीत सर्वाधिक बळींचा विक्रमही अनेक वर्षं कपिल देव यांच्या नावावर होता. (T20 World Cup, Kapil on Bumrah)

(हेही वाचा- पुण्यासह राज्यातील बार-पबमध्ये ‘ए आय’ कॅमेरे, Devendra Fadnavis यांनी विधानसभेत सांगितले…)

आता त्याच कपिल यांनी आपल्यापेक्षा जसप्रीत बुमराह १००० पट चांगला गोलंदाज आहे असं पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे. ‘बुमराहची अचूकता, सरस धावगती आणि हुशारीने केलेली गोलंदाजी यामुळे जसप्रीत अव्वल ठरतो,’ असं कपिल यांना वाटतं. (T20 World Cup, Kapil on Bumrah)

सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बुमराहने आतापर्यंत गोलंदाजी केलेल्या २३ षटकांमध्ये ४.०८च्या अप्रतिम इकॉनॉमीने ११ बळी घेतले आहेत. म्हणूनच कपिल यांना वाटतं की, बुमराह त्यांच्यापेक्षा पुढे आहे. (T20 World Cup, Kapil on Bumrah)

(हेही वाचा- सर्व समाजघटकांना न्याय देऊन विद्यार्थिनींच्या पंखांना बळ देणारा अर्थसंकल्प: Chandrakant Patil)

“बुमराह माझ्यापेक्षा १००० पट चांगला आहे. ही तरुण मुलं आमच्यापेक्षा खूप चांगली आहेत. आमच्याकडे अनुभव होता. ही मुलं आघीच सगळं शिकून येतात, ते चांगले आहेत,” कपिलने ‘पीटीआय व्हिडिओ’ला सांगितले. (T20 World Cup, Kapil on Bumrah)

बुमराह, ज्याला सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जाते, त्याने भारतासाठी २६ कसोटी खेळल्या आहेत, १५९ बळी घेतले आहेत आणि ८९ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४९ बळी टिपले आहेत. तर ६८ टी-२० सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ८५ बळी आहेत. (T20 World Cup, Kapil on Bumrah)

कपिल देव यांना ते खेळत असताना सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू समजलं जात होतं. कसोटी क्रिकेटमध्ये ४३४ तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५३ बळी त्यांच्या नावावर आहेत. सध्या ते ६५ वर्षांचे आहेत. आणि १९८३ चा एकदिवसीय विश्वचषक त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकला होता. पण, आता त्यांना पुढच्या पिढीचं कौतुक वाटतं,  (T20 World Cup, Kapil on Bumrah)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs SA : अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय होईल? आयसीसीचे नियम काय सांगतात?)

‘तरुण पिढी खूपच चांगली आहे. ते आमच्यापेक्षा तंदुरुस्त आहेत. मेहनत घेतात, ते विलक्षण आहेत,’ असं कपिल मुलाखतीत शेवटी म्हणतात. (T20 World Cup, Kapil on Bumrah)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.