Chief Minister face : मुख्यमंत्री पदासाठी Uddhav Thackeray यांच्या चेहऱ्याला शरद पवारांची नापसंती?

276
Maharashtra CM Face : उद्धव ठाकरेंच्या चेहेऱ्याला शरद पवारांचा विरोध?

लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) उबाठाने मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव पुढे करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी हाणून पाडला. पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही व्यक्ती नाही तर ‘सामूहिक नेतृत्व’ हेच आमचं सूत्र”.  (Chief Minister face)

चेहऱ्याशिवाय निवडणुक लढणे हा धोका

दोन दिवसापूर्वी उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री’ असं महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सूत्र आहे का? असे विचारले असता, ” असं कोणी सांगितल. कोणी जाहीर केले का? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणे हा धोका आहे. महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे काम पाहिले आहे.  लोकसभा निवडणुकीत  अनेक घटकांचं मतदान उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनसुद्धा झालेलं आहे.  अर्थात तिघांची ताकद एकत्र होती पण बिनचेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही. लोक स्वीकारणार नाहीत आणि लोकाना चेहेरा द्यावाच लागेल,” असे राऊत म्हणाले होते.  (Chief Minister face)

(हेही वाचा- T20 World Cup, Kapil on Bumrah : बुमराह माझ्यापेक्षा १००० पट चांगला, असं कपिल देव का म्हणतात?)

व्यक्ती नाही, ‘सामूहिक नेतृत्व’ हेच सूत्र

यावर शनिवारी सकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्रकार परिषदेत दोन वेळा विचारल्यानंतरही ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदासाठीच्या चेहेऱ्याला अप्रत्यक्ष नापसंती दर्शवली. ते म्हणाले, “आमची आघाडी आहे, हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे. कोणत्याही व्यक्तीबिक्तीबाबत आमचा निर्णय झाला नाही. सामूहिक नेतृत्व हे आमचे सूत्र आहे,” असं शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले. (Chief Minister face)

पवारांचा सल्ला

विशेष म्हणजे, शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घरात बसून राज्याचा कार्यभार पहात होते, ऑनलाइन बैठका घेत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच ठाकरे यांना सल्ला दिला होता की, त्यांनी घरातून बाहेर पडून काम करावे, राज्यात विविध ठिकाणी फिरावे. (Chief Minister face)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs SA : अंतिम सामन्यापूर्वी क्रिस गेलचा विराट कोहलीला पाठिंबा )

एकत्र बसून चर्चा करू

पवार यांच्या विधानावर संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा विचारले असता त्यांनी मूळ प्रश्नाला बगल देत सांगितले, “महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळेल. निवडणुकीला सामोरे जाताना चेहरा असावा हे आमचे मत आहे. आपण कोणासाठी मतदान करतोय हे लोकांना कळायला हवे. लोकांनी इंदिरा गांधी (Indira Gandhi), राजीव गांधी (Rajiv Gandhi), नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या चेहेऱ्याला पाहून मतदान केले. पण तीन पक्ष आणि इतर लहान घटकपक्ष एकत्र असल्यामुळे चेहरा कोण याच्याविषयी आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि निर्णय घेऊ. लोकसभेला आम्ही तिघांनी एकत्र निवडणूक लढवली, आणि महाराष्ट्रात काय निकाल लागला हे सर्वांनी पाहिले,” असे सांगून “आम्ही कोणत्याही परिस्थितीत एकत्र लढू आणि १७५-१८० जागा जिंकू, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. (Chief Minister face)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.