T20 World Cup, Ind vs SA : भारतीय संघ बार्बाडोसमध्ये उतरला तो क्षण 

T20 World Cup, Ind vs SA : भारताला उपांत्य ते अंतिम सामन्यामध्ये २४ तासांची विश्रांतीही मिळालेली नाही 

140
T20 World Cup, Ind vs SA : भारतीय संघ बार्बाडोसमध्ये उतरला तो क्षण 
T20 World Cup, Ind vs SA : भारतीय संघ बार्बाडोसमध्ये उतरला तो क्षण 
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय संघ भारतीय वेळेनुसार, शनिवारी सकाळी बार्बाडोसला पोहोचला तोच मूळी एका निर्धाराने. खेळाडूंच्या चेहऱ्यावर तसं दडपण नव्हतं. ते चाहत्यांशीही मोकळेपणाने गप्पा मारत होते. पण, त्यांची देहबोली काहीतरी सांगत होती. प्रत्येकाला तयार व्हायचं होतं एका मोठ्या सामन्यासाठी. तो निग्रह सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता. मागच्या ११ वर्षांत भारताने एकही आयसीसी करंडक पटकावलेला नाही. नोव्हेंबरमध्ये ती संधी थोडक्यात हुकली. आता भारताला टी-२० विश्वचषकात ती संधी गमावायची नाही.  (T20 World Cup, Ind vs SA)

(हेही वाचा- विधान परिषदेसाठी भाजपाच्या १० नेत्यांच्या नावांची यादी व्हायरल, Chandrasekhar Bawankule यांचं स्पष्टिकरण)

बीसीसीआयने (BCCI) संघाचा ताजा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. आणि यात खेळाडूंचा गयाना ते बार्बाडोस असा प्रवास दाखवला आहे. गयाना इथं उपांत्य सामना जिंकल्यानंतर तिथल्या चाहत्यांची प्रतिक्रिया, खेळाडूंचे काही मोकळे क्षण आणि तिथून लगेच खेळाडूंनी बार्बाडोससाठी विमान पकडलं तो क्षण. त्यानंतर थेट खेळाडू बार्बाडोसला पोहोचले तिथे आपण खेळाडूंबरोबर पोहोचतो. (T20 World Cup, Ind vs SA)

 २०१३ मध्ये भारताने चॅम्पियन्स करंडक जिंकला. त्यानंतर कुठलीही मोठी आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यातच विराट (Virat) आता ३५ वर्षांचा आहे. तर रोहीत ३६. त्यांचा हा शेवटचा टी-२० विश्वचषक असण्याची शक्यताच जास्त आहे. कोहलीने आतापर्यंत या स्पर्धेत फक्त ७५ धावा केल्या आहेत. तर रोहित (Rohit) २४८ धावांसह आघाडीवर आहे. आता विराटसाठी फॉर्म पुन्हा गवसण्यासाठी हाच सामना कामी येवो अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे. तर रोहितचा (Rohit) फॉर्म कायम राहो, अशी चाहत्यांची इच्छा असणार आहे. (T20 World Cup, Ind vs SA)

(हेही वाचा- Chief Minister face : मुख्यमंत्री पदासाठी Uddhav Thackeray यांच्या चेहऱ्याला शरद पवारांची नापसंती?)

गयानातील उपांत्य सामना आणि बार्बाडोसमधील अंतिम सामना या दरम्यान भारतीय संघाला सलग २४ तासही मिळालेले नाहीत. त्यामुळे बार्बाडोसमध्ये संघाने हॉटेलमध्ये राहणंच पसंत केलं आहे. संघ मानसिक, शारीरिक व रणनीतीच्या हिशोबाने तयार राहण्यावरच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी भर दिला आहे. (T20 World Cup, Ind vs SA)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.