Rajkot : दिल्लीनंतर आता ‘या’ विमानतळावर मोठा अपघात, टर्मिनलच्या बाहेरील छत कोसळले; पुढे काय झाले? वाचा सविस्तर…

157
Rajkot : दिल्लीनंतर आता 'या' विमानतळावर मोठा अपघात, टर्मिनलच्या बाहेरील छत कोसळले; पुढे काय झाले? वाचा सविस्तर...

गुजरातमधील राजकोट (Rajkot) येथील हिरासर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Hirasar International Airport) टर्मिनलच्या बाहेरील प्रवासी पिकअप ड्रॉप भागात छताचा काही भाग कोसळला. जोरदार वाऱ्यामुळे शेड कोसळला. जुलै २०२३मध्ये पंतप्रधान मोदी यांनी राजकोट विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले होते. सुदैवाने, जेव्हा हा अपघात झाला तेव्हा या छताखाली कोणीही नव्हते, अन्यथा दिल्ली विमानतळासारखा अपघात झाला असता. १४०० कोटींहून अधिक खर्च करून या विमानतळाचा विस्तार करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Monsoon Session: सभापतीपदाची निवडणुक कधी घेणार? विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक)

मुसळधार पावसामुळे अपघात
गुजरातच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला आहे. राजकोटमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. यामुळे राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलच्या बाहेर प्रवासी पिकअप आणि ड्रॉप भागात छप्परची एक बाजू कोसळली.

जबलपूर-दिल्ली आणि आता राजकोट
गुरुवारी, (२७ जून) जबलपूरमधील विमानतळाचे छत एका कारवर कोसळले. ही घटना दिल्ली विमानतळावर घडली. त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.