राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्याचा, त्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविणारा कोणताही खेळाडू या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आवश्यकता असल्यास निकषांमध्ये आणखी मुद्द्यांची भर घालण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. (Ajit Pawar)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून सदस्य हिरामन खोसकर यांच्याकडून खेळाडू कविता राऊत हिला उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपअधीक्षक पदावर नोकरी देण्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यासंदर्भात माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यातील विविध खेळांना, खेळाडूंना शासनाकडून नेहमीच प्रोत्साहन देण्यात येत आहे. (Ajit Pawar)
(हेही वाचा – Rajkot : दिल्लीनंतर आता ‘या’ विमानतळावर मोठा अपघात, टर्मिनलच्या बाहेरील छत कोसळले; पुढे काय झाले? वाचा सविस्तर…)
ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करून, पदक प्राप्त करून राज्याचा लौकिक वाढविला आहे, त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत. सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन या निकषांमध्ये आणखी काही मुद्द्यांचा भर घालण्याबाबत निश्चित विचार करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. (Ajit Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community