- ऋजुता लुकतुके
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी अलीकडेच आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये योगाच्या समावेशाचा प्रस्ताव मांडण्याचं जाहीर केलं होतं. या प्रस्तावाला क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी आता पाठिंबा दिला आहे. भारतीय योगाला जगाची मान्यता पूर्वीच मिळाली आहे. जगभर त्याचा प्रसार झाला आहे. आता स्पर्धात्मक पद्धतीने तो आशियाई स्तरावर खेळला गेला तर तो या खेळाचा सन्मानच असेल, असं मांडवीय यांना वाटतं. (Yoga in Asian Games ?)
‘योगा आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय आहे आणि अशा खेळाचा आशियाई क्रीडा स्पर्धेत स्पर्धात्मक समावेश होणं हे योग्यच आहे,’ असं मांडवीय यांनी ऑलिम्पिक असोसिएशनच्या पत्रकात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे २६ जूनला ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी आशियाई ऑलिम्पिक समितीला पत्र लिहून योगाचा आशियाई क्रीडास्पर्धेसाठी विचार व्हावा अशी विनंती केली आहे. (Yoga in Asian Games ?)
(हेही वाचा – Hoarding Accident: होर्डिंगचा प्रश्न हा केवळ मुंबईचाच नाही तर संपूर्ण राज्याचा – आ. तांबे)
क्रीडामंत्री मांडवीय यांनी योगाच्या प्रसारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचा आंतरराष्ट्रीय प्रसार केला आहे आणि त्यांच्या प्रयत्नांतून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून पाळला जातो. आता या प्रकाराला खेळाचं स्वरुप देऊन तो आशियाई क्रीडास्पर्धेत खेळला जावा यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत,’ असं मांडवीय म्हणाले. (Yoga in Asian Games ?)
भारतात खेलो इंडिया युथ गेम्स आणि खेलो इंडिया विद्यापीठ खेळांमध्ये योगाचा स्पर्धा प्रकार म्हणून समावेश झालेला आहे. आता तो आशियाई स्तरावर नेण्याचा भारताचा विचार आहे. आशियाई योगासनं ही एक संस्थाही योगाच्या स्पर्धात्मक प्रसारासाठी तयार झाली आहे आणि या संस्थेला इंटरनॅशनल योगा या संघटनेची मान्यता आहे. आता ऑलिम्पिक समितीच्या मान्यतेसाठी या संस्था प्रयत्नशील आहेत. (Yoga in Asian Games ?)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community