Dnyaneshwar Maharaj Palkhi चे आळंदीतून प्रस्थान

218
Dnyaneshwar Maharaj Palkhi चे आळंदीतून प्रस्थान
Dnyaneshwar Maharaj Palkhi चे आळंदीतून प्रस्थान

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री ज्ञानेश्वर माऊलीची पालखी  (Shri Dnyaneshwar Mouli Palkhi) आषाढी पायवारी (Ashadhi wari 2024) शनिवारी (दि. २९) पासून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. प्रस्थान सोहळादिनी आळंदीत दिवसभर माऊली-माऊली नामाचा गजर सुरू होता. परिणामी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. तत्पूर्वी शुक्रवारी (दि. २८) देहूनगरीतून तुकोबांच्या पालखीचे (Shri Tukaram Maharaj Palkhi) प्रस्थान झाले. अनेक भाविक आळंदीत माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी दाखल झाले होते. यंदा सुमारे साडेतीन लाखांहून अधिक भाविकांनी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदीत उपस्थिती लावली होती. (Dnyaneshwar Maharaj Palkhi)

आषाढीची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते. त्यामुळे पायीवारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांची मांदियाळी आळंदीत दाखल झाली. शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी अनेक वारकरी दिंड्यांसह आळंदीत दाखल झाले. परिणामी आळंदी भाविकांनी गजबजून निघाली. आळंदीत दाखल होताच प्रथमदर्शी भाविक माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहत होते. प्रस्थान सोहळ्यानंतर आजोळघरात अनेकांनी रांगेतून दर्शन घेतले. (Dnyaneshwar Maharaj Palkhi)

(हेही वाचा – Pune International Airport: पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार)

पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदी शहरात अनेक हार प्रसाद फुलांची व वारकरी साहित्य वस्तूंची दुकाने सजली असून मंदिरामधील दर्शनबारीत वारकरी भाविक ‘ज्ञानोबा माऊलीचा’ जयघोष करत होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेऊन वारकरी मंदिरामध्ये क्षणभर विसवून हरीनामाचा जप करताना दिसत होते. अनेकांनी महाद्वाराबाहेर राहून प्रस्थान सोहळा अनुभला. (Dnyaneshwar Maharaj Palkhi)

(हेही वाचा – BMC : महापालिकेत अनुभवी अभियंत्यांची फळी निवृत्त, कोस्टलच्या प्रमुख अभियंत्यावर रस्त्याचा भार)

रविवारी पुण्यात दुसरा मुक्काम…

आजोळघरात रविवारी (दि.३०) पहाटे साडेपाच वाजता परंपरेनुसार शितोळे सरकारांचा माऊलींच्या पालखीला नैवद्य दाखविला जाईल. सहाच्या दरम्यान शितोळे सरकारांचे अश्व अजोळघरी आणून त्यांना मानपान देण्यात येईल. त्यानंतर माऊलींची पालखी आळंदी ग्रामस्थ व मानकऱ्याच्या खांद्यावर घेऊन नगरपालिकेसमोर सजविलेल्या रथात विराजमान करण्यात येईल. त्यानंतर  वाजत – गाजत हा पालखी सोहळा पुढे धाकट्या पादुका व नंतर साईमंदिरासमोर थोरल्या पादुकांशेजारी जाऊन विसावा घेईल. येथे आरती झाल्यानंतर साडेनऊच्या सुमारास पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. (Dnyaneshwar Maharaj Palkhi)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.