T20 World Cup Final: रो-को चा आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला रामराम!

190
T20 World Cup Final: रो-को चा आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला रामराम!
T20 World Cup Final: रो-को चा आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला रामराम!

भारतानं टी-20 विश्वचषक (IND vs SA, T20 World Cup 2024) जिंकला आणि कोट्ववधी भारतीयांचं स्वप्न साकार केलं आहे. भारत विश्वविजेता ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रोमांचक सामन्यात भारताने अखेरच्या षटकात विजय मिळवला. यासह कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती जाहीर केली. याआधी विराट कोहलीने फायनलमध्ये सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर निवृत्ती घेतली होती. (T20 World Cup Final)

(हेही वाचा –T20WorldCupFinal: विश्वचषकातील दिमाखदार विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचं अभिनंदन; म्हणाले…)

पत्रकार परिषदेत रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्तीची माहिती दिली. निवृत्तीची घोषणा करताना रोहित शर्मा म्हणाला, “हा माझा शेवटचा सामना आहे. या फॉरमॅटला अलविदा करण्याची यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही. या फॉरमॅटचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला आहे. मी या फॉरमॅटमध्ये खेळून भारतासाठी माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि मला हेच हवे होते. मला हा विश्वचषक जिंकायचा होता. मी पूर्णपणे हरवून गेलो आहे आणि मी माझ्या भावना शब्दात मांडू शकत नाहीय. शब्दात व्यक्त करता येत नाही. काल रात्री, मला झोपही येत नव्हती कारण मी हताश होतो आणि ट्रॉफी मिळवण्याची वाट पाहत होतो. पण मी मैदानात स्वतःला चांगल्याप्रकारे सावरले.” असं रोहित शर्मा भावूक झाल्यानंतर म्हणाला. (T20 World Cup Final)

विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत

सामनावीर पुरस्कार स्वीकारताना विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला, ”हा माझा अखेरचा टी-२० विश्वचषक होता. टी20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न साकार झाले आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला धावा काढताना झगडता. तुम्ही धावा घेऊ शकत नसल्याचं जाणवतं. मग गोष्टी घडतात, बदलतात. देव महान आहे, ज्या दिवशी संघाला सर्वात जास्त गरज असते. त्यादिवशी संघासाठी माझ्या बॅटमधून धावा निघाल्या. हा माझा अखेरचा टी20 सामना आहे. अखेरच्या सामन्यात मला जास्त फायदा घ्यायचा होता. विश्वचषक उंचवायचा होता. आता पुढच्या पिढीने जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे, काही अप्रतिम खेळाडू संघाला पुढे नेतील आणि भारताचा झेंडा फडकवत ठेवतील.” असे विराट कोहली म्हणाला. (T20 World Cup Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.