राज्याच्या विविध भागात पाऊस (Maharashtra Rain) पडत आहे. कुठे मुसळधार पाऊस पडतोय, तर कुठे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आज कुठे पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) तर कुठे यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Rain)
(हेही वाचा –Hawkers Free Dadar Station :दादर फेरीवाला मुक्त, रेल्वे स्थानक परिसर मोकळा करण्यात पहिल्या दिवशी ७५ टक्के यश)
कोकणात पावासाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड (Raigad) आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. (Maharashtra Rain)
(हेही वाचा –Bank Holidays in July : जुलै महिन्यात १२ दिवस बँका बंद)
मुंबईसह (Mumbai) पालघर (Palghar) आणि ठाण्यात देखील जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. (Maharashtra Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community