T20 World Cup Final: बार्बाडोसच्या मैदानात रोवला भारताचा ध्वज; सामना कसा अन् कुठे फिरवला? वाचा सविस्तर…

213
T20 World Cup Final: बार्बाडोसच्या मैदानात रोवला भारताचा ध्वज; सामना कसा अन् कुठे फिरवला? वाचा सविस्तर...
T20 World Cup Final: बार्बाडोसच्या मैदानात रोवला भारताचा ध्वज; सामना कसा अन् कुठे फिरवला? वाचा सविस्तर...

तब्बल १७ वर्षांनी टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup Final) जिंकत भारतानं इतिहास रचला. पहिलावहिला टी-२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताला दुसऱ्या वर्ल्डकपसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. भारतानं प्रथम फलंदाजी करत ७ बाद १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेला ८ बाद १६९ धावा करता आल्या. १५ व्या षटकानंतर आफ्रिकेला ३० चेंडूत ३० धावा हव्या होत्या. सामना भारताच्या हातून जवळपास निसटला होता. पण भारताच्या जलदगती गोलंदाजांची टिच्चून मारा करत सामना अक्षरश: खेचून आणला. (T20 World Cup Final)

संपूर्ण विश्वचषकात दमदार फलंदाजी करणारा रोहित फायनलमध्ये खेळला नाही, पण कोहली मात्र ठाम होता. 76 धावा केल्या. अक्षर आणि शिवमने ही सर्वतोपरी प्रयत्न केले. 177 धावांचे लक्ष्य दिले. दक्षिण आफ्रिका फलंदाजीला आली. 14 षटकांपर्यंत त्यांचे फलंदाज झपाट्याने विजयाकडे वाटचाल करत होते. यानंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) , हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गोलंदाजीवर परतले आणि भारताने सामन्यात पुनरागमन केले. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) धावा करू शकला नाही, पण झेल घेऊन सामना फिरवला. (T20 World Cup Final)

सामना हातातून निसटत असल्याची जाणीव होताच कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे जबाबदारी दिली. बुमराहने १६ वं षटक टाकलं. आणि फक्त ४ धावा दिल्या. आता आफ्रिकेसाठी विजयाचं समीकरण होतं, ४ षटकांत २६ धावा. मग रोहितने हार्दिक पांड्याकडे चेंडू दिला. त्याने पहिलाच चेंडू फुलटॉस टाकला. क्लासनने षटकार मारण्यासाठी बॅट फिरवली. पण सीमारेषेवर सूर्यकुमार यादवने अफलातून झेल घेतला आणि सामना फिरायला सुरुवात झाली. क्लासनने अवघ्या २७ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५२ धावा कुटल्या. पांड्याने १७ व्या षटकात फक्त ४ धावा दिल्या. शिवाय क्लासनला तंबूत धाडलं. 32 वर्षांपासून चोकर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा संघ यावेळीही डाग घेऊन परतला. (T20 World Cup Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.