भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या नेतृत्वाखाली टी-२० वर्ल्ड कप २०२४ (T20 World Cup 2024) जिंकण्याचा मान पटकावला. भारताने या निर्णायक सामन्यात (IND-vs-SA) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि १७६ धावा केल्या याबदल्यात आफ्रिका संघ केवळ १६९ धावा करू शकला. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी आपापल्या पद्धतीने जल्लोष साजरा केला. रोहितनेही अनोखे सेलिब्रेशन केले त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक खास व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. यामध्ये रोहित खूप भावूक दिसत होता, तर त्याच्या भावनाही स्पष्ट चेहऱ्यावर दिसत होत्या. रोहितने बार्बाडोस स्टेडियमच्या खेळपट्टीच्या मातीची चव चाखली. रोहितने खाली खेळपट्टीवर बसत तेथील मातीची चव चाखली आणि त्याला नमस्कार केला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रोहितच्या भावनांचीही कल्पना येऊ शकते. या सामन्यात जरी रोहितला बॅटने विशेष काही करता आले नसले तरी कर्णधारपदाच्या बाबतीत त्याने तो नेहमीप्रमाणेच प्रभावी ठरला.
रोहित शर्माचा (Rohit Sharma) हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तमाम भारतीय चाहत्यांना सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचीही आठवण झाली, जेव्हा तो मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धचा शेवटचा सामना खेळला आणि हा सामना संपल्यानंतर तो खेळपट्टीवर गेला आणि त्याने नमन केले. विराट कोहलीने रोहितसह अंतिम सामन्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
रोहितने सामन्यानंतर अनेक पद्धतीने सेलिब्रेशन केले. वर्ल्ड कप जिकंताच रोहित ग्राउंडमध्ये झोपून जमिनीवर हात आपटू लागला. सगळ्या खेळाडूंना घट्ट मिठी मारून रडू लागला. सर्वात सुखावणारा क्षण म्हणजे जेव्हा हिटमॅनने भारताचा झेंडा बार्बाडोसमधील मैदानावर अभिमानाने फडकावला. पत्नीला मिठी मारली, मैदानांवर नतमस्तक झाला. यासोबतच रोहितने ज्या पीचवर सामना खेळला गेला त्या पीचवरची माती चाखली. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Rohit Sharma)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community