आज अनेक लोकप्रतिनिधी निवडून येण्यापूर्वी हिंदुत्वनिष्ठ असल्याचे दाखवतात; मात्र सत्तेची खुर्ची प्राप्त झाल्यावर ते धर्मनिरपेक्ष होतात. असे लोकप्रतिनिधी हिंदु राष्ट्रासाठी वा हिंदुत्वासाठी काहीही करणार नाहीत. धर्मनिरपेक्ष नेते हिंदू राष्ट्राच्या मागणीला विरोधच करतील. त्यामुळे किमान ५० हिंदुत्वनिष्ठ खासदार निवडून आणणे आवश्यक आहे, जे संसदेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करतील, असे स्पष्ट आवाहन तेलंगणा राज्यातील येथील गोशामहलचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह (T. Rajasingh) यांनी गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘हिंदु राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग आवश्यक’ या विषयावर बोलतांना केले.
आमदार श्री. टी. राजासिंह (T. Rajasingh) पुढे म्हणाले की, तेलंगणातील अनेक जिल्ह्यांत अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र आहे; मात्र श्रीरामनवमीच्या वेळी लाखो हिंदू भगवे ध्वज घेऊन बाहेर पडतात. त्यामुळे तेथील मुख्यमंत्र्यांनाही आमचा विचार करावा लागतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून राष्ट्राचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. प्रशासनातील मोठे अधिकारी, नेते हिंदुत्वाच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदुत्वनिष्ठ यांना त्रास दिला जातो. याला उत्तर देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ युवकांना चांगले शिक्षण घेऊन उच्च पदांवर पोहोचण्यास साहाय्य करा, जेणेकरून ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान देऊ शकतील. येणारा काळ कठीण आहे. हिंदु राष्ट्राचे वा धर्मकार्य करायचे असेल, तर घाबरून चालणार नाही. संतांनी सांगितले आहे की, साधनेने हे वातावरण बदलता येईल. त्यामुळे अखंड हिंदु राष्ट्रासाठी साधना करणे आवश्यक आहे. (T. Rajasingh)
(हेही वाचा- T20 World Cup Final: जगज्जेतेपदानंतर पंतप्रधान मोदींचा टीम इंडियाशी फोनवरुन संवाद; पंतप्रधान मोदी काय म्हणाले?)