T20 World Cup Final: टीम इंडिया मायदेशात कधी परतणार? विजयी मिरवणूक कधी? वाचा सविस्तर…

219
T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषक विजेतेपदाची रक्कम कशी विभागली जाणार? कुणाला किती रुपये मिळणार?

सूर्यकुमार यादवच्या एका कॅचने संपूर्ण सामना (T20 World Cup Final) फिरला आणि प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याने सुटकेचा निश्वास सोडला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा झेल घेत भारताला टी-२० ट्रॉफी जिंकून दिली. सात महिन्यांपूर्वी 19 नोव्हेंबर 2023 रोजी 50 ओव्हरच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताच वर्ल्ड कप विजयाच स्वप्न भंग पावलं होतं. त्यावेळी कोट्यवधी भारतीयांच मन मोडलं होतं. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर मात केली होती. आता T20 वर्ल्ड कप विजयाच देशभर सेलिब्रेशन सुरु आहे. (T20 World Cup Final)

यादरम्यान, टीम इंडिया (Team India) मायदेशात कधी परतणार? याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. दिल्ली, मुंबई, लखनऊ, भोपाळ, जयपूर, चंदीगड उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र टीम इंडियाच्या विजयाचा फक्त जल्लोष दिसला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी मैदानावर सेलिब्रेशन केलं, तर सर्वसामान्यांनी रस्त्यावर फटाके फोडून, तिरंगा फडकवून सेलिब्रेशन केलं. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती, टीम इंडियाच्या मायदेशी परतण्याची. मायदेशात टीम इंडियाच भव्य स्वागत होणार आहे. (T20 World Cup Final)

भारतात परतण्याचा प्रवास कसा असेल?

टीम इंडिया आज बारबाडोसमध्येच (Barbados) आहे. 30 जून वर्ल्ड कपसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. सोमवारी (१ जुलै) टीम इंडिया 11 वाजता बारबाडोसवरुन न्यू यॉर्कसाठी रवाना होईल. मंगळवारी न्यू यॉर्क येथून एमिरेट्स फ्लाइटने दुबईला जाणार आहे. तिथून टीम इंडिया भारतात येईल. बुधवारपर्यंत टीम इंडिया भारतात येऊ शकते. (T20 World Cup Final)

विजयी मिरवणूक कधी?

अजून हे ठरलेलं नाहीय की दुबईवरुन खेळाडू मुंबईला जाणार की, दिल्लीला? याची माहिती आज येऊ शकते. त्यानंतर टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघेल, त्याच शेड्युलड अजून आलेलं नाही. भारत चार वर्ल्ड कप जिंकणारा क्रिकेट विश्वातील तिसरा संघ बनलाय. याआधी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 7 वेळा आणि वेस्ट इंडिजने चारवेळा वर्ल्ड कप जिंकलाय. (T20 World Cup Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.