अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी विधानसभा लढवण्याबाबत सूचक विधान केले आहे. माझी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे. पण महायुती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे त्या म्हणाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघातून त्यांनी इच्छुक असल्याचे म्हंटले आहे. मात्र याबाबत महायुतीकडून अधिकृत घोषणा झाल्यावरच चित्र स्पष्ट होईल.
(हेही वाचा –संसदेत ‘हिंदु राष्ट्रा’ ची मागणी करतील असे ५० हिंदुत्वनिष्ठ खासदार निवडून आणा; T. Rajasingh यांचे हिंदूंना आवाहन)
रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या, ”2019 मध्ये मी खडकवासला मधून मी उमेदवारी मागितली होती. तेव्हा मला राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष करण्यात आले होते. लोकसभेत खडकवासला मधून मताधिक्य आहे. माझ्या मतदारसंघातून सुद्धा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना मताधिक्य आहे. नक्कीच माझी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे. पण तरिही महायुती जो निर्णय घेईल तो मान्य असेल.” असे त्या म्हणाल्या.
(हेही वाचा –रस्ते अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात: Dr. Neelam Gorhe)
तसेच संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचं प्रस्थान झाले आहे. वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत जात आहेत. या वारीत विविध उपक्रम राबवण्यात येतात. या उपक्रमांवर रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दर वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आरोग्यवारी अभियानाचे उपक्रम राबवण्यात आला आहे. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना सोयीसुविधा देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते, असे त्या (Rupali Chakankar) म्हणाल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community