महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिला अधिकारी; Sujata Saunik स्वीकारणार पदभार

Sujata Saunik : सेवाज्येष्ठतेनुसार (१९८७च्या तुकडीतील) गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (१९८८) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (१९८९) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात होते.

515
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिला अधिकारी; Sujata Saunik स्वीकारणार पदभार
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिला अधिकारी; Sujata Saunik स्वीकारणार पदभार

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला आयएएस अधिकाऱ्याची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या राज्याच्या मुख्य सचिव डॉ. नितीन करीर (Nitin Karir) यांची जागा घेतील. सध्याचे मुख्य सचिव नितीन करीर निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महायुती सरकारने 1987च्या बॅचच्या आय.ए.एस. अधिकारी सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.

(हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्माने विजयानंतर चाखली बार्बाडोसच्या खेळपट्टीवरील विजयाची चव!)

सुजाता सौनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालील राज्य सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुख असतील. सुजाता सौनिक पुढील वर्षी जूनमध्ये निवृत्त होणार आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार (१९८७च्या तुकडीतील) गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (१९८८) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (१९८९) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात होते. सुजाता सौनिक जून २०२५ मध्ये निवृत्त होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमताने सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी निवड केली. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने महिला मतदारांना एक भक्कम संदेश दिला आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकारने अलीकडेच चौथ्या महिला धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. याच काळात सुजाता सौनिक यांनी नियुक्ती झाली आहे.

कोण आहेत सुजाता सौनक ?

शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुजाता सौनिक यांच्याकडे सध्या राज्याच्या गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने अलीकडेच त्यांना सचिव पदावर पदोन्नती दिली आहे. त्यांनी सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही काम केले आहे. सार्वजनिक आरोग्यासह इतर अनेक विभागांमध्येही त्यांनी काम केले आहे.

सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांना आरोग्यसेवा, वित्त, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा, राज्य आणि संघराज्य स्तरावर शांतता राखण्याचा आणि संयुक्त राष्ट्रांचा भाग म्हणून भारतीय प्रशासकीय सेवा आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाचा तीन दशकांचा अनुभव आहे. सरकारने त्यांचे पती मनोज सौनिक यांची एप्रिल-डिसेंबर 2023 पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. सध्या मनोज सौनिक हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.