Sambhajinagar येथे बुरखा घातलेल्या मुलीशी बोलल्यामुळे जमावाकडून आकाशला अमानुष मारहाण

Sambhajinagar येथे २० ते २२ वर्षीय बुरखाधारी तरुणी शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाजवळून जात होती. त्याच दरम्यान तिला आकाश नावाचा मित्र भेटला. ते दोघे तेथे गप्पा मारत असतांनाच ४० ते ५० वयोगटातील इसमाने मुलीवर हात उगारला.

213
Sambhajinagar येथे बुरखा घातलेल्या मुलीशी बोलल्यामुळे जमावाकडून आकाशला अमानुष मारहाण
Sambhajinagar येथे बुरखा घातलेल्या मुलीशी बोलल्यामुळे जमावाकडून आकाशला अमानुष मारहाण

परधर्मीयातील तरुणासोबत बोलत असल्याच्या संशयावरून जवळच्यांनीच मुलीवर पाळत ठेवली. मुलगी तरुणासोबत बोलताना दिसताच दोघांना पकडून मारहाण सुरू केली. तर सोबतच्या टवाळखोरांनी तरुणाला मारहाण करून जखमी केले. संभाजीनगर (Sambhajinagar) येथील ही घटना आहे. आकाश असे या बुरखाधारी मुलीशी बोलणाऱ्या पीडित मुलाचे नाव आहे.

(हेही वाचा – Mahanirmiti चे बनावट नियुक्ती पत्र व्हायरल; बेरोजगार तरुण-तरुणींनी सावध रहाण्याचे आवाहन)

२० ते २२ वर्षीय बुरखाधारी तरुणी शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाजवळून जात होती. त्याच दरम्यान तिला आकाश नावाचा मित्र भेटला. ते दोघे तेथे गप्पा मारत असतांनाच ४० ते ५० वयोगटातील इसमाने मुलीवर हात उगारला. काही क्षणांतच जवळपास ५० ते ८० जणांचा जमाव त्या दिशेने धावत गेला. त्यांना पाहून बुरखाधारी मुलीने आकाशला पळून जाण्यास सांगितले. जमावाने पाठलाग करून पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली.

महिला पोलिसाच्या हस्तक्षेपानंतरही मारहाण

बुरखाधारी तरुणी आकाश नावाच्या परधर्मीय तरुणासोबत बोलत असल्याच्या रागातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीला पकडल्यानंतर जमाव आकाशच्या मागे लागला. लेबर कॉलनीतील मोकळ्या जागेवर नेत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. बुरखाधारी मुलगी त्याला न मारण्यासाठी जमावाला विनवण्या करत होती. जमावाने तरुणाला मारहाण सुरूच ठेवली. काही जणांनी तरुणीला दूर नेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तेथूनच मुलाला शाळेतून घेऊन घरी जाणाऱ्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने जमावाला सुनावून मुलीला हात न लावण्याची तंबी दिली. त्यानंतरही जमावाने आकाशचा पाठलाग करून मारहाण सुरुच ठेवली.

आकाश आणि बुरखाधारी तरुणीचा शोध सुरू

स्थानिकांनी नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे दिसताच टवाळखोरांनी पळ काढला. रात्री उशिरापर्यंत आकाश आणि बुरखाधारी तरुणीचाही शोध सुरू होता. त्यांचा शोध लागल्यास त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला जाईल. अन्यथा पोलीस स्वतः गुन्हा दाखल करून टवाळखोरांचा शोध घेतील, असे बगाटे म्हणाले. (Sambhajinagar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.