एलपीजी सिलेंडरच्या (LPG Price Reduced) दरांत सोमवारी (१ जुलै) बदल करण्यात आले आहेत. एलपीजी (LPG Gas) स्वस्त झाला असून सर्वसामान्यांना काहीसा दिला मिळणार आहे. एलपीजी सिलेंडरचे (LPG Cylinder) दर 30 ते 31 रुपयांनी स्वस्त झाले असून आज 1 जुलैपासून लागू केले जाणार आहेत. (LPG Price Reduced)
एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये झालेली घट ही 19 किलोंच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये करण्यात आलेली आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतींत मात्र, कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एलपीजी सिलेंडरच्या घटलेल्या दरांचा फायदा हॉटेल व्यावसायिकांना होणार आहे. (LPG Price Reduced)
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती बदल नाही
घरगुती 14.2 किलोग्राम एलपीजी सिलेंडरच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. एलपीजी सिलेंडरचे पूर्वीचेच दर स्थिर आहेत.
एलपीजी सिलेंडर किती स्वस्त?
- मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1598 रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत प्रति सिलेंडर 1629 रुपये होती.
- राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1646 रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत 1676 रुपये प्रति सिलेंडर होती.
- कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1756 रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत प्रति सिलेंडर 1787 रुपये होती.
- चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1809.50 रुपये झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत 1840.50 रुपये प्रति सिलेंडर होती. (LPG Price Reduced)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community