लोणावळ्यामध्ये भुशी डॅम्पच्या (lonavala bhushi dam) बॅकवॉटरमधील धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली. धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध सुरु आहे. वाहून गेलेल्या पाच जणांमध्ये चार अल्पवयीन मुले आणि एका महिलेचा समावेश आहे. (lonavala bhushi dam)
मृतदेह सापडले
मृत्यू झालेल्या महिलेच वय ३६ तर दोन्ही मुलींचं वय हे १३ आणि ८ वर्षे आहे. इतर ४ वर्षाची मुलगी आणि ९ वर्षाच्या मुलाचा शोध सुरू होता. तर, वाहून गेलेल्यामध्ये साहिस्ता लियाकत अन्सारी (वय- 36), अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 13), उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 8) यांचा समावेश आहे. या घटनेत त्या तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच अदनान अन्सारी (वय- 4), मारिया अन्सारी (वय- 9) या दोघांचा शोध सुरू आहे. (lonavala bhushi dam)
कशी घडली घटना?
लोणावळ्यातील भुशी डॅम्प सध्या ओवरफ्लो झाला आहे. त्या ठिकाणी पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. रविवारी अन्सारी परिवार भुशी डॅम्पवर पर्यटनासाठी आला होता. जंगलातून येणाऱ्या बॅक वॉटरवरील धबधब्यावर अन्सारी परिवार पाण्याचा आनंद घेत होता. तेव्हा धबधब्यात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यात दहाजण अडकले होते. त्या पैकी पाच जणांना बाहेर काढण्यात यश आले तर पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. (lonavala bhushi dam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community