Kedarnath blizzard : केदारनाथमध्ये हिमवादळ; बर्फ वितळून कोसळण्याची स्थिती! व्हिडीओ व्हायरल

233
Kedarnath blizzard : केदारनाथमध्ये हिमवादळ; बर्फ वितळून कोसळण्याची स्थिती! व्हिडीओ व्हायरल
Kedarnath blizzard : केदारनाथमध्ये हिमवादळ; बर्फ वितळून कोसळण्याची स्थिती! व्हिडीओ व्हायरल

केदारनाथ मंदिरामागील चौराबारी ग्लेशियरच्या वरच्या भागात हिमस्खलनामुळे (Kedarnath blizzard) मोठ्या प्रमाणात हिमखंड तुटून खाली पडत आहे. हिमखंड तुटल्याने मोठा आवाज झाला आणि केदारपुरीतील सर्व लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या घटनेत कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

जीवितहानी नाही

चोराबाडी ग्लेशिअरमधून मोठ्या प्रमाणात बर्फ वितळून कोसळण्याची स्थिती निर्माण झाली. बर्फ ५ मिनिटे कोसळत राहिला व मंदिरापासून ४ किमीवर गांधी सरोवराजवळ दरीत सामावला. यात जीवितहानी झाली नाही. ११ वर्षांपूर्वी १६ जून २०१३ रोजी ढगफुटी झाल्याने चोराबाडी सरोवर फुटले आणि केदारनाथमध्ये पुरामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. (Kedarnath blizzard)

लोक घराबाहेर पडले

केदारनाथचे स्थानिक लोक आणि प्रवासी मोठ्या आवाजामुळे घराबाहेर पडले आणि त्यांनी हे दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. हिमखंड तुटण्याची या वर्षात तिसरी वेळ आहे. हिमालयाच्या उच्च प्रदेशात हिमस्खलन वारंवार घडते. या वर्षी मे महिन्यात केदारनाथ धाममध्येही हिमस्खलन झाले होते, तर गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही हिमस्खलनाच्या तीन घटना घडल्या होत्या. (Kedarnath blizzard)

प्रवाशांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सतर्क करण्यात आले

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, पहाटे ५.०६ वाजता झालेल्या हिमस्खलनामुळे केदारनाथमध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही, मात्र केदारनाथहून वरच्या भागात जाणाऱ्या प्रवाशांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सतर्क करण्यात आले आहे. (Kedarnath blizzard)

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.