परळ, मालाडला बनतो अवघ्या तीन हजारांत Passport; सीबीआयच्या कारवाईने खळबळ

मालाड (Malad) आणि लोअर परळ (Lower Parel) येथील अधिकारी पुरेशी कागदपत्रे नसतांनाही किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे दलालांच्या ग्राहकांना Passport देत असत, असे तपासात उघड झाले आहे.

186
परळ मालाडला बनतो अवघ्या तीन हजारांत Passport; सीबीआयच्या कारवाईने खळबळ
परळ मालाडला बनतो अवघ्या तीन हजारांत Passport; सीबीआयच्या कारवाईने खळबळ

मालाड (Malad) आणि लोअर परळ (Lower Parel) येथील पासपोर्ट सेवाकेंद्रात अवघ्या दोन ते तीन हजारांत पासपोर्ट अधिकारी दलालांना पासपोर्ट देत असल्याचे उघड झाले आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांसह दक्षता विभागाचे अधिकारी आणि विभागीय पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी २६ जूनला परळ आणि मालाड येथील पासपोर्ट (Passport) सेवा केंद्रांची तपासणी केली. त्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

(हेही वाचा – Sunita Williams खरेच अंतराळात अडकल्‍या आहेत ?; काय म्हणाले इस्रोप्रमुख Somnath ?)

संबंधित अधिकाऱ्यांनी दलालांकडून मित्र, पत्नी, तसेच अन्य नातेवाइकांच्या खात्यावर पैसे घेतल्याचे उघड झाले आहे. सीबीआयने लोअर परळ आणि मालाडच्या पासपोर्ट सेवाकेंद्रांवर कार्यरत असलेल्या १४ पासपोर्ट अधिकाऱ्यांसह ३२ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत १२ गुन्हे दाखल केले आहेत. पारपत्र सेवाकेंद्रांवरील पारपत्र साहाय्यक आणि दलाल यांच्याशी संबंधित नाशिक व मुंबईतील ३३ ठिकाणी सीबीआयने शोधमोहीम राबवून महत्त्वपूर्ण कागदपत्रे हस्तगत केली आहेत. संबंधित पासपोर्ट अधिकारी दलालांशी हातमिळवणी करून गैरव्यवहार करत असल्याचा आरोप आहे. ते पुरेशी कागदपत्रे नसतांनाही किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे दलालांच्या ग्राहकांना पासपोर्ट देत असत.

संशयित अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची आणि मोबाइलची तपासणी करण्यात आली. कार्यालयातील कागदपत्रे, सोशल मीडियावरील संदेश आणि यूपीआयवरील आर्थिक व्यवहारांचीही तपासणी करण्यात आली. त्यात संबंधित अधिकाऱ्यांनी दलालांशी काही व्यवहार केल्याचे आढळले. दलालांचे काम करण्याच्या बदल्यात त्यांनी हे व्यवहार केल्याचा संशय आहे. यात लोअर परळ कार्यालयातील सर्वाधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांना किती मिळाले पैसे ?

लोअर परळ येथील पासपोर्ट सेवा केंद्रातील कनिष्ठ अधिकारी रवी सिवातच याच्या बँक खात्यात दलाल श्रीनिवास शामलकडून जूनमध्ये ३ हजार रुपये आल्याचे आढळले. कनिष्ठ अधिकारी रवी प्रकाश मीनाच्या बँक खात्यात मे २०२३ ते मे २०२४ दरम्यान २५ लाख ४७ हजार रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे आढळले. कनिष्ठ अधिकारी हिमांशू यादवच्या खात्यात दलाल जय हरयाच्या बँक खात्यातून साडेपाच हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

कनिष्ठ अधिकारी आश्रम मीनाच्या खात्यात दलाल पराग तालकरकडून ५७ हजार ५०० रुपये आल्याचे आढळले आहे. अमन नावाच्या अधिकाऱ्यानेही गेल्या तीन महिन्यांत तीन दलालांकडून ३३ हजार ५०० रुपये स्वीकारले आहेत. वरिष्ठ पासपोर्ट (Passport) साहाय्यक अशोक कुमार यांच्या खात्यात १० हजार, तर हेमंत मीनाच्या खात्यातही १० हजारांचे संशयित व्यवहार आढळले. मालाड कार्यालयातील व्हेरिफिकेशन ऑफिसर आकाश राठीच्या खात्यात २३ हजार ५०० रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत. अशाच प्रकारे अन्य अधिकाऱ्यांच्या बँक खात्यातही संशयास्पद व्यवहार आढळले असून त्यानुसार सीबीआय अधिक तपास करत आहे. त्यांच्या बँक खात्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांचीही तपासणी सीबीआय करीत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.