अनेकांना झोपेत चालण्याची सवय असते असं आपण यापूर्वीही ऐकलं आहे. पण, याच झोपेत चालण्याच्या सवयीमुळे एका 19 वर्षांच्या तरुणाचा नाहक बळी (Mumbai Crime) गेल्याची घटना भायखळा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. माझगाव येथे राहणाऱ्या चुनावाला कुटुंबातील 19 वर्षांच्या मुलाचा इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन कोसळून मृत्यू झाला आहे.
(हेही वाचा –Ipsos Survey : देशातील जनतेचा सर्वाधिक विश्वास सैन्यावर; विश्वासार्हतेत राजकारण्यांचा क्रमांक शेवटचा)
मुस्तफा इब्राहिम चुनावाला (Mustafa Ibrahim) असं या मृत तरुणाचं नाव आहे. चुनावाला कुटुंबीय हे टॉवर नंबर 1, नेसबीट रोड, माझगाव येथे राहातं. चुनावाला यांच्या मुलाला झोपेत चालण्याची सवय होती. 30 जूनच्या मध्यरात्री मुस्तफा हा झोपेत चालत असताना सहाव्या माळ्यावरून खाली कोसळला. तो तिसऱ्या मजल्यावरील पोडियम स्पेसमध्ये पडला. यात मुस्तफा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचरासाठी सेफी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी मुस्तफाला तपासून मृत घोषित केलं. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Mumbai Crime)
(हेही वाचा –Lonavala Bhushi Dam : भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन!)
भायखळा पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणाऱ्या चुनावाला कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चुनावाला यांना एक 19 वर्षांचा मुलगा होता. या मुलाला झोपेत चालण्याची सवय होती. 30 जून च्या मध्यरात्री मुस्तफा झोपेत चालत असताना सहाव्या माळ्यावरून खाली पडला. मुस्तफा तिसऱ्या मजल्यावरील पोडियम स्पेसमध्ये पडला. त्यानंतर त्याला तात्काळ सेफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community