महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी या महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह एकूण ५ जणांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.
(हेही वाचा – Mumbai Crime: झोपेत चालणं जीवावर बेतलं; सहाव्या मजल्यावरुन कोसळला आणि मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!)
पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांनाही भाजपाने उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेचे हे आमदार विधान परिषद सदस्यांमार्फत निवडले जाणार आहेत. त्यामध्ये महायुतीचं संख्याबळ पाहता भाजपाचे ५ उमेदवार विजयी होऊ शकतात. त्यानुसार भाजपाने पाच जणांना आपल्याकडून संधी दिली आहे.
BJP announces the names of candidates for the Maharashtra Legislative Council biennial elections
Pankaja Munde also announced as party’s candidate for MLC elections pic.twitter.com/B3ijp0ZdCX
— ANI (@ANI) July 1, 2024
राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा सोमवारी चौथा दिवस आहे. विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे. (Pankaja Munde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community