लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सभापती ओम बिर्ला यांच्यावर रुसून नाराजी व्यक्त केली. त्यांनी सभापतींसोबतच्या त्यांच्या भेटीची आठवण करून दिली आणि सांगितले की, जेव्हा सभापती त्यांना भेटले तेव्हा त्यांनी सरळ उभे राहून हस्तांदोलन केले. मात्र, पंतप्रधान मोदींना भेटण्याची त्यांची शैली वेगळी होती. त्यांनी त्यांना वाकून नमस्कार केला.
राहुल गांधींच्या (Rahul Gandhi)या वक्तव्यानंतर संपूर्ण सभागृहात गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधींना पाठिंबा दिला. लोकसभा अध्यक्षांनीही राहुल गांधींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहाचे नेते आहेत. माझी संस्कृती सांगते की, जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांच्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे आणि समानतेने वागले पाहिजे.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, “दोन लोक सभागृहाच्या खुर्चीवर बसले आहेत. एक स्पीकर आणि एक ओम बिर्ला. जेव्हा मी आणि मोदीजी तुमच्याशी हस्तांदोलन करायला गेलो, तेव्हा मला काहीतरी लक्षात आले. मी तुमच्याशी हस्तांदोलन करायला गेलो, तेव्हा तुम्ही सरळ उभे राहून हस्तांदोलन केले, पण जेव्हा मोदीजी तुमच्याशी हस्तांदोलन करायला गेले तेव्हा तुम्ही त्यांच्यापुढे वाकून हस्तांदोलन केले. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उभे राहून कडाडून विरोध केला. अमित शाह म्हणाले, “हे अध्यक्षांच्या आसनाचा अपमान करत आहेत.
(हेही वाचा Rahul Gandhi संसदेत बरळले, म्हणाले, हिंदू केवळ हिंसा आणि द्वेष पसरवतात; पंतप्रधान मोदींनी दिली समज)
लोकसभा अध्यक्ष काय म्हणाले?
राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) टीकेला उत्तर देताना लोकसभा अध्यक्ष म्हणाले, “माझी संस्कृती, मूल्ये हेच सांगतात, वैयक्तिक जीवनात, सार्वजनिक जीवनात आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे. आवश्यक असल्यास त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करावा. वयाने तुमच्या बरोबरीचे आहेत त्यांच्याशी बरोबरीचे वर्तन करावे. ही संस्कृती मी शिकलो आहे.
राहुल गांधींकडून लोकसभा अध्यक्षांचे खंडन
अध्यक्षांच्या उत्तरानंतर राहुल गांधी पुन्हा उभे राहिले आणि म्हणाले की, मी त्यांचा मुद्दा आदराने स्वीकारतो. राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, “या सभागृहात सभापतींपेक्षा कोणीही मोठा नाही. सभापती हा सर्वात मोठा आहे आणि आपण सर्वांनी लोकसभा अध्यक्षांसमोर नतमस्तक झाले पाहिजे. मी नतमस्तक होईल आणि संपूर्ण विरोधक तुमच्यापुढे झुकतील. राहुल गांधी यांनी सभापती ओम बिर्ला यांना सांगितले, “ही लोकशाही आहे आणि तुम्ही या सभागृहाचे संरक्षक आहात आणि तुम्ही कोणाच्याही पुढे झुकू नका. असे सांगताना राहुल गांधी म्हणाले की, या सभागृहात सर्वांना समानतेने वागवले पाहिजे.
Join Our WhatsApp Community