- ऋजुता लुकतुके
आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय चमू पदकांचा नवा उच्चांक रचेल अशी आशा क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी रविवारी बोलून दाखवली. केंद्र सरकारने अलीकडे भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी ठोस पावलं उचलली आहेत आणि त्याचा खेळाडूंना फायदा मिळतोय, असंही त्यांनी बोलून दाखवलं. त्यांच्या हस्ते पॅरिसला स्पर्धेसाठी निघालेल्या खेळाडूंना निरोप आणि शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. (Paris Olympic 2024)
रविवारी मांडवीय यांच्याहस्ते खेळाडूंच्या अधिकृत किटचंही अनावरण झालं. ‘भारतीय खेळाडूंची क्षमता आता वाढलेली आहे. आणि पॅरिसमध्ये टोकयोतील यशालाही आपण मागे टाकू, असा विश्वास वाटतो,’ असं मनसुख मांडवीय पीटीआयशी बोलताना म्हणाले. (Paris Olympic 2024)
Get ready to be dazzled! ✨
Check out the highlights from the official kit launch and send-off ceremony for the Paris Olympics! This prestigious event was graced by Hon’ble Union Minister for Youth Affairs and Sports Dr. Mansukh Mandaviya and IOA President PT Usha.
Our hockey… pic.twitter.com/Vu9HXexjx5
— Hockey India (@TheHockeyIndia) June 30, 2024
(हेही वाचा – येत्या गुरुवार पासून Gokhale Bridge वरील दुसरी पर्यायी मार्गिका होणार सुरू)
‘रिओमध्ये भारतीय चमूने २ पदकं मिळवली होती. पण, चारच वर्षांनी भारत ६७ व्या स्थानावरून ४७ व्या स्थानावर पोहोचला. नीरज चोप्राच्या सुवर्ण पदकामुळे हे साध्य झालं. शिवाय भारतीय संघाने एकूण ७ पदकंही जिंकली. आता वेळ आली आहे ती ही कामगिरीही मागे टाकण्याची. सरकारने टॉप्स योजनेच्या माध्यमातून खेळाडूंना अर्थसहाय्य देऊ केलं आहे. त्यामुळे कामगिरीतही सुधारणा दिसत आहे. आता पदकं जिंकण्याची वेळ आली आहे,’ असं मांडवीय म्हणाले. (Paris Olympic 2024)
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. उषा यांनीही टोकयोपेक्षा चांगली कामगिरी खेळाडूंकडून पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली. १२० खेळाडूंचं पथक यावेळी पॅऱिस ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे. तर सगळ्यात जास्त २१ खेळाडू नेमबाजीत उतरणार आहेत. (Paris Olympic 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community