Lok Sabha Session : ओम बिर्ला यांचा राहुल गांधी यांना वडीलकीचा सल्ला!

209
Lok Sabha Session : ओम बिर्ला यांचा राहुल गांधी यांना वडीलकीचा सल्ला!

नवे नवे विरोधी पक्ष नेते झालेले राहुल गांधी यांचा उत्साहापोटी भाषण करताना तोल गेला आणि त्यांनी मर्यादा सोडून भाष्य केले. एवढेच नव्हे तर, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरही ताशेरे ओढले. यामुळे बिर्ला थोडे नाराज झाले पण त्यांनी राहुल गांधी यांना संस्कृती आणि मर्यादेचे भान ठेवण्याचा सल्ला दिला. (Lok Sabha Session)

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्यबाबतही आक्षेपार्ह विधान केले. राहुल गांधी म्हणाले की, “जेव्हा मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी हस्तांदोलन केले तेव्हा मला काहीतरी लक्षात आले. मी जेव्हा तुमच्याशी हस्तांदोलन केले तेव्हा तुम्ही माझ्यासोबत सरळ उभे राहून हस्तांदोलन केले होते. पण जेव्हा मोदी तुमच्याशी हस्तांदोलन करीत होते तेव्हा तुम्ही त्यांच्यापुढे वाकून हस्तांदोलन करीत होता. लोकसभेचे अध्यक्ष हे या सभागृहात सर्वात मोठे आहेत. त्यांनी कुणापुढेही वाकून राहता कामा नये”. (Lok Sabha Session)

(हेही वाचा – Indian Railway: रेल्वेच्या ‘या’ गाड्यांची वेळ आणि टर्मिनल बदलले! जाणून घ्या एका क्लिकवर)

राहुल यांच्या कमेंटवर ओम बिर्ला यांनी दिले ‘हे’ उत्तर 

बिर्ला म्हणाले, “पंतप्रधान सभागृहाचे नेते आहेत. सार्वजनिक जीवनात आणि वैयक्तिक जीवनात आपली मूल्ये अशी आहेत की आपण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला भेटलो तर आपण त्यांना नतमस्तक व्हावे आणि त्यांचा आदर केला पाहिजे, तर आपल्या बरोबरीची किंवा वयाने लहान असलेल्या व्यक्तींना भेटले पाहिजे. मी ही संस्कृती आणि मूल्ये पाळतो.” ते म्हणाला, ”मी हे सहज सांगू शकतो. वडिलधाऱ्यांचा आदर करणे आणि गरज पडल्यास त्यांच्या पायाला स्पर्श करणे ही माझी संस्कृती आहे.” (Lok Sabha Session)

राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना दोन्ही नेत्यामधील चर्चा चांगली रंगली. राहुल गांधी त्यांचेच म्हणणे खरे असल्याचे भासविण्यासाठी हा मुद्दा रेटून लावत होते. ते पुन्हा म्हणाले की, “या सभागृहात आपल्यापेक्षा मोठा कोणी नाही. येथे आपला शब्द शेवटचा आहे. अध्यक्ष जे बोलतात ती भारतीय लोकशाहीची व्याख्या ठरते. या सीटवर आपण बसले आहात. या सभागृहातील ‘प्रत्येकाने आपला आदर केला पाहिजे. मी आपल्यापुढे नतमस्तक होईन आणि संपूर्ण विरोधक आपल्यापुढे नतमस्तक होईल”. (Lok Sabha Session)

दरम्यान, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवनियुक्त विरोधी पक्ष नेते यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करीत संसदेच्या नियमाचे पालन करण्याचा सल्ला दिला. (Lok Sabha Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.