Maharashtra legislative election मध्ये अनिल परब, अभ्यंकर आणि निरंजन डावखरे विजयी

429

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मंतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. त्यामध्ये उबाठाचे अनिल परब यांनी पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवला, तर शिक्षक मतदारसंघातून उबाठाचेच ज. मो. अभ्यंकर यांचा विजय झाला,  भाजपचे निरंजन डावखरे यांचा विजय झाला. (Maharashtra legislative election)

मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आणि भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांच्यात थेट लढत होती. अनिल परब यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला. परब यांचा 44 हजार 784 मते मिळवून विजय
झाला. तर दुसरीकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर यांचा देखील विजय झाला आहे. तर दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपला गड कायम राखला आहे. डावखरे यांनी माध्यमांशी बोलताना मतदारांचे आभार देखील व्यक्त केले. (Maharashtra legislative election)

(हेही वाचा नेपाळमध्ये Muslim यांनी हिंदू गावाचे नाव बदलून केले ‘मोहम्मद नगर’, हिंदू तरुणालाही मारहाण)

ज. मो. अभ्यंकर 4 हजार 83 मतांनी विजयी

विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 11 हजार 598 मते वैध ठरली तर 402 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले. (Maharashtra legislative election)

निरंजन वसंत डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी

विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मते वैध ठरली तर 11 हजार 226 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 66 हजार 036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.