पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, 2 जुलै रोजी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देतील. संपूर्ण एन.डी.ए. तयारीसह पंतप्रधान मोदींसमवेत संसद भवनात असेल, असे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सकाळी 9:30 वाजता एनडीएच्या खासदारांची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदी सभागृहात खासदारांशी रणनीतीवर चर्चा करतील. विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
(हेही वाचा – Lieutenant General Dheeraj Seth यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवडून आलेले राहुल गांधी यांनी सोमवार, 1 जुलै रोजी पहिल्यांदा भाषण केले. राहुल गांधी सुरुवातीपासूनच पंतप्रधान मोदी यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. तसेच हिंदूंवरही गरळओक केली. सगळे हिंदू हिंसक असतात, या राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर लोकसभेत मोठा गदारोळ झाला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी’, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल (Rahul Gandhi) यांच्या ९० मिनिटांच्या भाषणात त्यांनी अनेक आरोप केले. याला सत्ताधारी खासदार आणि मंत्री यांनी विरोध केला. लोकसभा अध्यक्षांनीही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला. तरीही त्यांनी आरोप चालूच ठेवले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community