ब्रिटनमध्ये (Britain) ४ जुलै रोजी मतदान आहे. पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची चिंता वाढली आहे. सुनक यांच्या सत्तारूढ हुजूर पक्षाला भारतीय मतदारांकडूनही पाठिंबा मिळत नाही. येथील ६५% भारतीय मतदार सुनक यांच्या पक्षाविरुद्ध आहेत, असे यूगॉवच्या सर्व्हेमध्ये दिसून आले आहे. या वेळी ब्रिटनमध्ये सुमारे २५ लाख भारतीय मतदान करतील.
(हेही वाचा – India T20 Champion : वादळामुळे भारतीय संघ बार्बाडोसमध्येच अडकलेला)
भारतीय मतदार निर्णायक भूमिकेत
ब्रिटनच्या ६५० पैकी ५० जागांवर भारतीय मतदार निर्णायक भूमिका बजावतात. यापैकी १५ जागा उदा. लेस्टर, बर्मिंगहॅम, कॉन्व्हेंट्री, साऊथ हॉल आणि हॅरॉसमध्ये भारतीय वंशाचे उमेदवार २ निवडणुकीतून जिंकत आहेत. या जागांवर या वेळी हुजूर पक्षाप्रति भारतीय मतदारांमध्ये रोष आहे. येथे मजूर पक्षाच्या उमेदवारांना मोठा पाठिंबा मिळत आहे. सध्या या १५ जागांपैकी १२ हुजूर पक्षाकडे आहेत.
भारतीय का नाराज ?
पक्षाच्या रणनीतीकारांना वाटत होते की, सुनक भारतीय वंशाचे असल्यामुळे येथील भारतियांचा कल हुजूर पक्षाकडे असेल. सुनक यांनीही आऊटरीचचे प्रयत्न केले, मात्र यशस्वी झाले नाहीत.
यूगॉवच्या सर्वेक्षणात सहभागी भारतीय मतदारांनुसार, पंतप्रधान सुनक यांच्या जवळपास दीड वर्षांच्या कार्यकाळादरम्यान भारतियांच्या बाजूने कोणतेही पाऊल उचलले नाही. व्हिसा नियमांत आधीपेक्षा जास्त कठोरता आणली आहे. यासोबत महागाई आणि रोजगाराच्या मुद्द्यांवरही सुनक (Rishi Sunak) ठोस पावले उचलत नाहीत.
हेही पहा –