India T20 Champion : वादळामुळे भारतीय संघ बार्बाडोसमध्येच अडकलेला

भारतीय संघाने अंतिम सामना जिंकल्यानंतर बार्बाडोसमध्ये सुरू झालेलं वादळ शमलेलं नाही

162
India T20 Champion : वादळामुळे भारतीय संघ बार्बाडोसमध्येच अडकलेला
India T20 Champion : वादळामुळे भारतीय संघ बार्बाडोसमध्येच अडकलेला
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापासून पाऊस दूर राहिला हे क्रिकेटचं नशीब. पण, त्यानंतर मात्र वेस्ट इंडिजमधील बार्बाडोसला चतुर्थ श्रेणीच्या वादळाने झोडपलं आहे. त्यामुळे सोमवार सकाळपासून तिथं वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू आहे. आणि परिणामी, भारतीय संघ बार्बाडोसलाच अडकला आहे. फक्त भारतीय संघच नाही तर बार्बाडोस शहरात अघोषित लॉकडाऊनची परिस्थिती आहे. बार्बाडोसमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी सध्या बंद आहे. तर शहरात अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला आहे. (India T20 Champion)

या परिस्थितीमुळे भारतीय संघ निदान आणखी एक दिवस भारतात येऊ शकणार नाही. ‘तुमच्यासारखे आम्हीही इथे अडकलोय. आता पहिलं प्राधान्य खेळाडू आणि इथं अडकलेल्या पत्रकारांना देशातून सुरक्षितपणे बाहेर काढणं हे आहे. त्यानंतर भारतात पोहोचलो की, संघाच्या सत्कार समारंभाचा नक्की विचार करू,’ असं शाह यांनी काही पत्रकारांशी बोलताना सांगितलं. (India T20 Champion)

(हेही वाचा – BMC Health Insurance: मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा वैद्यकीय गटविमा योजना, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची निवड)

भारतीय संघ तिथल्या एका पंचताराकित हॉटेलमध्ये राहात आहे. भारतीय संघ आणि अंतिम सामन्यासाठी आलेले बीसीसीआयचे पदाधिकारी व सन्माननीय माजी खेळाडू हे एका चार्टर्ड विमानाने सोमवारी बार्बाडोसहून निघणार होते. पण, रविवार संध्याकाळपासून इथं जोरदार पाऊस सुरू झाला आहे. (India T20 Champion)

‘आम्ही काही चार्टर्ड विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांशी संपर्कात आहोत. इंधन भरण्यासाठी अमेरिका किंवा युरोपमध्ये एखादा थांबा घेऊन थेट भारतात परतायचं अशीच आमची योजना आहे. पण, पावसाने सगळं विस्कळीत झालंय. इथं अडकलेल्या मीडिया कर्मचाऱ्यांनाही बरोबर आणण्याचा किंवा सुरक्षित बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असं जय शाह पीटीआयशी बोलताना म्हणाले. (India T20 Champion)

बार्बाडोसमध्ये वादळी वाऱ्यांमुळे विमान उड्डाणं शक्य होत नाहीएत. हवामानाच्या अंदाजानुसार, मंगळवारपासून वाऱ्यांचा वेग कमी होईल आणि तसं झालं तर विमान उड्डाणं हळू हळू शक्य होतील. भारतीय संघ मंगळवारी बार्बाडोसहून निघण्याची शक्यता आहे आणि संघ आधी नवी दिल्लीला जाऊन पंतप्रधानांची भेट घेईल असंही बोललं जातंय.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.