माझ्या सनातनी हिंदू बंधू-भगिनींनो जागे व्हा; Ketaki Chitale ची पोस्ट चर्चेत

आम्ही हिंदुराष्ट्राची मागणी केली तर तुम्ही आम्हाला भगवे दहशतवादी म्हणता. हे सगळे चालते, कारण आम्ही सनातनी झोपून आहोत, आम्ही कधीच जाग येणार नाही, अशी पोस्ट Ketaki Chitale हिने केली आहे.

200
माझ्या सनातनी हिंदू बंधू-भगिनींनो जागे व्हा; Ketaki Chitale ची पोस्ट चर्चेत
माझ्या सनातनी हिंदू बंधू-भगिनींनो जागे व्हा; Ketaki Chitale ची पोस्ट चर्चेत

शिवजींचा एक फोटो घेऊन ते म्हणतात की, शिवजींनी असे म्हटले आहे की, घाबरू नका. हे शिवजींनी कधी म्हटले. संपूर्ण हिंदू समाजाचा तुम्ही अशा प्रकारे अपमान करता तेव्हा हे सगळे चालते का? तिचे पश्चिम बंगलामध्ये टीएमसीचा आमदार एका महिलेला मारहाण होत असताना सरळ म्हणतात की, मुस्लिम राष्ट्रात अशा गोष्टी चालतात. मुस्लिम राष्ट्र? आणि जर आम्ही हिंदुराष्ट्राची मागणी केली तर तुम्ही आम्हाला भगवे दहशतवादी म्हणता. हे सगळे चालते, कारण आम्ही सनातनी झोपून आहोत, आम्ही कधीच जाग येणार नाही. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शन दिले की, आम्हाला हिंदूराष्ट्र हवे आहे. माझ्या सनातनी हिंदू बंधू-भगिनींनो… जागे व्हा, अशी पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने इन्स्टाग्रामवर केली आहे.

(हेही वाचा – का साजरा केला जातो UFO दिन? एलियन्स खरोखर असतात का?)

काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेत हिंदू समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका केली जात आहे. यात अभिनेत्री केतकी चितळे हिनेही राहुल गांधींवर वर टीका करणारी पोस्ट करून तिला खडेबोल सुनावले आहेत.

आज संसदेत राहुल गांधी यांनी असे म्हटले की,’हिंसक व्यक्ती कधी हिंदू असू शकत नाही.’ तुम्हाला असे म्हणायचे आहे का की, आपले सर्व देव-देवता हिंदू नाही आहेत? त्यांनी राक्षसांना मारले म्हणून ते सनातनी नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? कालीमातेची शक्ती रुपातच पूजा केली जाते, मग ती सनातनी नाही आहे का? शंकराची एक फ्रेम हातात घेऊन ते म्हणतात की, शिवजींनी असे म्हटले की, घाबरू नका-घाबरू नका, असेही केतकी चितळे हिने म्हटले आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवार, 1 जुलै रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पहिले भाषण केले. भगवान शिव आणि गुरु नानक यांचे फोटो दाखवून राहुल यांनी संसदेत भाषणाला सुरुवात केली. राहुल काही बोलण्यापूर्वीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना अडवले. त्यांनी हिंदू हिंसक असतात, असे विधान केल्याने हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.