Australia Visa Fee Increase : ऑस्ट्रेलियाने शैक्षणिक व्हिसा शुल्क दुपटीने वाढवलं

ऑस्ट्रेलियातील निर्वासितांचा लोंढा थांबवण्यासाठी सरकारने ही भूमिका घेतली आहे

119
Australia Visa Fee Increase : ऑस्ट्रेलियाने शैक्षणिक व्हिसा शुल्क दुपटीने वाढवलं
Australia Visa Fee Increase : ऑस्ट्रेलियाने शैक्षणिक व्हिसा शुल्क दुपटीने वाढवलं
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियातील शिक्षण आता आणखी महाग होणार आहे. तिथल्या सरकारने बाहेरून इथं शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक व्हिसा शुल्क तब्बल १०० टक्क्यांनी वाढवलं आहे. (Australia Visa Fee Increase) पूर्वी व्हिसा शुल्क ७१० ऑस्ट्रेलियन डॉलर इतकं होतं. ते आता थेट १,६०० डॉलरवर गेलं आहे. तर जे पर्यटन किंवा व्हिजिट व्हिसावर ऑस्ट्रेलियात आहेत, त्यांना तिथूनच शैक्षणिक व्हिसासाठी अर्ज इथून पुढे करता येणार नाही.

‘ऑस्ट्रेलियाच्या व्हिसा धोरणात आम्ही केलेले बदल हे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मूल्यांना धरून केले आहेत. आणि ऑस्ट्रेलियाचं निर्वासितांसाठीचं धोरण सर्वांना समान आणि योग्य न्याय देणारं तसंच प्रशासनाला हाताळण्याइतकं सुटसुटीत असावा, हा त्यामागचा हेतू आहे,’ असं ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री क्लेअर ओ नील यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पॅरिसला निघालेल्या खेळाडूंना सुवर्णपदक विजेत्या अभिनवचा मोलाचा सल्ला)

सप्टेंबर २०२३ ला जाहीर झालेल्या आकडीवारीनुसार, २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियात तब्बल ५,४८,८०० निर्वासित दाखल झाले होते. त्यामुळे देशातील बांधकाम उद्योगावरही त्याचा विपरित परिणाम झाला. मागणी इतकी घरंही काही शहरांत उपलब्ध नव्हती. आणि रिअल इस्टेट क्षेत्रात किमतीत फुगवटा निर्माण झाला. स्थानिक ऑस्ट्रेलियन लोकांना घरं परवडेनाशी झाली. (Australia Visa Fee Increase)

त्यानंतर ऑस्ट्रेलियन सरकारवर निर्वासितांचं धोरण बदलण्यासाठी दबाव होता. शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात येऊन पुढे स्थायिक होणाऱ्या लोकांची संख्या २०२३ मध्ये ३० टक्क्यांनी वाढल्याचं सरकारच्या लक्षात आलं. त्यामुळे सुरुवातीला सरकारने अशा विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यावर्षी मार्च महिन्यात आधी इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाची अट आणखी कडक करण्यात आली. त्यानंतर आता व्हिसा शुल्क वाढवण्याचा निर्णय झाला आहे. (Australia Visa Fee Increase)

खरंतर ऑस्ट्रेलियन अर्थव्यवस्थेत आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा वाटा ३६ अब्ज अमेरिकन डॉलर इतका आहे. आणि हा देशाच्या कमाईचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.