काँग्रेस परजीवी पक्ष; PM Narendra Modi यांचा घणाघात

२०२४च्या निवडणुकीत काँग्रेसला जनतेने जनादेश दिला आहे, विरोधी पक्षातच बसा आणि ओरडत रहा, असे जनतेने म्हटले आहे. काँग्रेसच्या इतिहासात हा पहिला प्रसंग आहे सलग तीन वेळा काँग्रेस १००चा आकडा पार करू शकली नाही. काँग्रेस तिसऱ्यांदा १०० चा आकडा पार करू शकली नाही, आत्मपरीक्षण करण्यापेक्षा काँग्रेस शीर्षांसन करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

154
Modi Government च्या स्थिरतेसाठी बजेट महत्त्वपूर्ण; विरोधक तोंडघशी

काँग्रेसला १३ राज्यांत शून्य जागा मिळाल्या आहेत, तरी हिरो आहे ना, मी काँग्रेसला समजावतो जनादेशाला नीट समजून घ्या. काँग्रेस ज्या पक्षाजवळ जाते तेव्हा त्या पक्षाचे मत खाते, काँग्रेस परजीवी आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसची भाजपसोबत थेट लढत होती तिथे कँग्रेसचा स्ट्राईक रेट २६ टक्के आहे, पण जिथे काँग्रेस कुणाचा तरी पदर पकडून होती, तिथे त्यांचा स्ट्राईक रेट ५० टक्के आहे. ९९ जागांपैकी अनेक जागा काँग्रेस मित्र पक्षाच्या सोबतीने जिंकली. या निवडणुकीत काँग्रेस परजीवी बनली आणि मित्र पक्षांच्या खांद्यावर चढून ९९ जागा मिळवल्या. जर काँग्रेसने मित्र पक्षांची मते खाल्ली नसती तर एवढ्या जागाही काँग्रेस जिंकली नसती, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेत केला.

नापास होण्याचा रेकॉर्ड

२०२४च्या निवडणुकीत काँग्रेसला जनतेने जनादेश दिला आहे, विरोधी पक्षातच बसा आणि ओरडत रहा, असे जनतेने म्हटले आहे. काँग्रेसच्या इतिहासात हा पहिला प्रसंग आहे सलग तीन वेळा काँग्रेस १००चा आकडा पार करू शकली नाही. काँग्रेस तिसऱ्यांदा १०० चा आकडा पार करू शकली नाही, आत्मपरीक्षण करण्यापेक्षा काँग्रेस शीर्षांसन करत आहे. आणि उगाचच काँग्रेस भाजपाला हरवले, असे सांगू लागली आहे. सध्या काँग्रेस लहान मुलाचे मन खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. १० वर्षांत निवडणुका झाल्या, काँग्रेस सगळे मिळून अडीचशे जागा मिळवू सकाळी नाही. ९९ गुण मिळवून एक मुलगा फिरत म्हणायचा, बघा किती गुण मिळाले, तेव्हा सगळे जण शाबासकी देत होते, तेव्हा शिक्षक म्हणाले, १०० पैकी ९९ गुण मिळवले नाही तर ५४८ पैकी ९९ गुण मिळवले आहेत. आता त्या मुलाला कोण समजावणार की तू नापास होण्याचा रेकॉर्ड केला आहेस, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता म्हणाले.

काँग्रेसने सैन्यदलात बरबाद केले 

आज जेव्हा देश विकासाच्या मार्गावर आला असताना काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. दक्षिणमध्ये जाऊन उत्तरेच्या विरोधात बोलतात. महापुरुषांवर टीका करते. काँग्रेस देशात जाती जातींमध्ये वाद निर्माण करण्यासाठी खोटे बोलत आहे. देशात आर्थिक अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.  निवडणुकीत खोटी आश्वासने दिली. ४ जून ला जर आमच्या मनाप्रमाणे निकाल लागले नाही तर देशात आग लावू असे जाहीरपणे म्हणाले, हे अराजकता पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. देशाला दंगलीच्या खाईत लोटण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. सैन्य दल तरुण असले पाहिजे, युद्धाच्या पद्धती बदलत आहेत, त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देशाची सेना तयार करण्यासाठी आम्ही खोटे आरोप सहन करत आहेत. नेहरूंच्या काळात देशाची सेना कमजोर होती. देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेसने सैन्यात घोटाळ्यांची श्रुंखला बनवली आणि देशाच्या सैन्य दलाची ताकद कमी केली. देशाच्या सैन्याला बरबाद केले. विरोधी बाकावर बसल्यावरही ते सैन्याला कमजोर करत आहेत. भारताच्या सैन्याला मजबूत बनवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व सुधारणेला काँग्रेसच्या विरोध करत आली आहे. इंदिरा गांधी यांनी वन रँक वन पेन्शन योजना वर्षांपर्यंत लागू केली नाही. एनडीए सरकारने ही पेन्शन लागू केली. १ लाख २० हजार कोटी रुपये आमच्या सरकारने माजी सैनिकांना दिले, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

(हेही वाचा राहुल गांधींचे लोकसभेतील भाषण म्हणजे बालिश कृत्य, बालक बुद्धी; PM Narendra Modi यांची जोरदार फटकेबाजी )

२०१४ पूर्वी जनता निराशेच्या गर्तेत होती 

या देशाने अनेक वर्षे तुष्टीकरणाचे राजकारण पाहिले, आम्ही संतुष्टीकरणाचा विचार स्वीकारला आहे. या निवडणुकीने हे सिद्ध केले आहे की भारतीय जनता किती परिपक्व आहे. त्यामुळे आम्ही तिसऱ्यांदा सत्तेत आलो आहोत. 2014 चे दिवस आठवा, आपल्या देशातील जनता निराशेच्या गर्तेत बुडाली होती, हताश झाली होती. त्यावेळी दररोज घोटाळे ऐकायला मिळत होते. घोटाळेबाज लोकांचा कालखंड होता. 2014 आधी सत्ताधारी बेशरमेने घोटाळ्याचा स्वीकार करत होते. रेशनसाठीही लाच द्यावी लागायची, जनता आशा सोडून बसली होती, निराशेच्या गर्तेत जनता बुडाली होती, तेव्हा जनतेने आम्हाला सेवा करण्याची सेवा दिली, 10 वर्षात आम्ही अनेक कामे केली, त्यातील एक देश निराशेच्या गर्तेतून बाहेर पडला. त्यावेळी बड्या बड्यांचे हात कोळशाने काळे झाले होते, आज देश सर्वाधिक कोळशाचा उत्पादक देश बनला आहे. २०१४ आधी दहशतवादी जिथे पाहिजे तिथे हल्ला करायचे, निर्दोष लोक मारले जायचे, सरकार मूग गिळून गप्प असायचे, आजचा हिंदुस्थान घर मे घुसकर मारतो, सर्जिकल स्ट्राईक करतोय, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

भाजपला निवडणुकीत मोठा जनादेश 

मतपेटीच्या राजकारणासाठी ३७० कलमाचे समर्थन करणारे तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये संविधान लागू करण्याची हिंमत करत नव्हते, आता हेच लोक संविधान संविधान करत आहेत. तेव्हा काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक व्हायची, काश्मीरमध्ये काहीच होऊ शकत नाही, असे वाटू लागले, आम्ही ३७० ची भिंत पाडली आणि दगडफेक बंद झाली. आम्ही आता देशाच्या इकोनॉमिला जगात तिसऱ्या स्थानावर नेणार आहे, त्यासाठी सेमी कंडक्टर आणि अन्य वस्तूंच्या निर्माणावर भर देणार आहे. त्यामुळे युवकांना रोजगार मिळणार, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.  एनडीएचे तिसऱ्यांदा सरकारमध्ये येणे ही ऐतिहासिक घटना आहे. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी हे घडले आहे, याचा अर्थ ही सिद्धी मिळवणे किती कठीण होते, जनतेच्या सेवेतून हे घडते. देशात ४ राज्यांची निवडणूक झाली त्या चारही राज्यांमध्ये एनडीएने अभूतपूर्व यश मिळवले. महाप्रभु जगन्नाथची धरती ओडिसाने आम्हाला आशीर्वाद दिला, आंध्र प्रदेशात क्लीन स्वीप दिला. भाजपने केरळात खाते खोलले आहे. तामिळनाडूत अनेक जागांवर भाजपने जनादेश मिळवला. कर्नाटकात भाजपचे मत टक्का वाढला. आता महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथे निवडणूक येत आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत या तीन राज्यांत आम्हाला मागच्यापेक्षा अधिक मते मिळतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.