विविध शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्थांलगतच्या परिसरामध्ये विडी, सिगारेट, तंबाखू किंवा गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असून या विक्री विरोधात मुंबई महानगरपालिकेच्या एफ (उत्तर) विभागाच्या वतीने मदतीने मंगळवारी २ जुलै २०२४ धडक कारवाई करण्यात आली. यावेळी चार दुकानांवर धडक कारवाई करत त्यांच्याकडून विक्री केला जाणारा एकूण ९३ किलो ५०० ग्रॅम तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे रुईया, पोतदार कॉलेज आणि व्हीजेटीआयसह फाईव्ह गार्डनचा परिसर टोबॅको फ्री झाला आहे. (Tobacco Free Colleges and Schools)
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा-२००३ च्या कलम-४ नुसार, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य कोणत्याही शैक्षणिक संस्थांलगतच्या परिसरात विडी, सिगारेट किंवा अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्री करण्यास तसेच बाळगण्यास प्रतिबंध आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शैक्षणिक संस्था परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. (Tobacco Free Colleges and Schools)
(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या भाषणावर भाजपचे नेते संतापले; माफी मागण्याची केली मागणी)
शैक्षणिक संस्थांलगतचा परिसर तंबाखूजन्य पदार्थ मुक्त करण्याच्या उद्देशाने परिमंडळ उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांच्या देखरेखीखाली एफ उत्तर विभागाच्या वतीने धडक मोहीम मंगळवारी २ जुलै २०२४ रोजी हाती घेण्यात आली. त्याअंतर्गत दोन वेगवेगळ्या पथकांद्वारे कोकरी आगार येथील म्हाडा कॉलनी परिसरातील प्रियदर्शनी शाळा आणि एस. के. रॉयल शाळा, शीव परिसरातील साधना शाळा, माटुंगा परिसरातील रुईया महाविद्यालय आणि पोतदार महाविद्यालय, मंचेरजी जोशी उद्यान (फाइव्ह गार्डन) परिसरातील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) तसेच माहेश्वरी उद्यान परिसर या ठिकाणी कारवाई करत ९५ किलो ५०० ग्रॅम तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. त्यामध्ये विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा आदींचा समावेश आहे. तसेच याठिकाणी असलेले तंबाखूचे एक दुकान आणि तीन बाकडे हटवण्यात आले आहेत. यावेळी पोलिसांनी कारवाईसाठी सहकार्य लाभले. (Tobacco Free Colleges and Schools)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community