Chandrayaan 3 : इस्त्रोच्या चंद्रयान- 3 ने मिळवले मोठे यश; प्रग्यान रोवरने केले महत्वाचे संशोधन

187
Chandrayaan 3 : इस्त्रोच्या चंद्रयान- 3 ने मिळवले मोठे यश; प्रग्यान रोवरने केले महत्वाचे संशोधन
Chandrayaan 3 : इस्त्रोच्या चंद्रयान- 3 ने मिळवले मोठे यश; प्रग्यान रोवरने केले महत्वाचे संशोधन

भारताचा तिसरे मून मिशन चंद्रयान-3 (Chandrayaan 3 ) ला मागील वर्षी मोठे यश मिळाले होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) चंद्रयान-3 (Chandrayaan 3 ) ला दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँड करत इतिहास निर्माण केला होता. द्रक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत पहिला देश ठरला होता. आचा चंद्रयान-3 संदर्भात नवीन माहिती मिळाली आहे. त्यामुळे चंद्र जवळून समजून घेण्यास शास्त्रज्ञांना खूप मदत होणार आहे. चंद्रयानच्या प्रग्यान रोवरने शिवशक्ती पॅाइंटजवळ महत्वाचे संशोधन केले आहे. हे संशोधन चंद्राची निर्मिती आणि त्या ठिकाणी जमीन, खडकांचे तुडके यासंदर्भातील आहे.

(हेही वाचा- Ganeshotsav : चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षण सुरू)

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, चंद्रयान-3 (Chandrayaan 3 ) चा विक्रम लँडमध्ये असणाऱ्या प्रग्यान रोवरने चंद्राच्या पुष्ठभागावरील जवळपास 103 मीटर आंतर कापले आहे. रोवर मॅन्जिनस आणि बोगुस्लावस्की क्रेटर दरम्यान चालला. या संपूर्ण भागाबाबत जगभरातील वैज्ञानिकांमध्ये कुतूहल आहे. चंद्रयान-3 ज्या ठिकाणी लँड झाला होता, त्या जागेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती पॅाइंट नाव दिले आहे. या ठिकाणी प्रग्यानला लहान खडकांचे तुकडे मिळाले, ज्यांची लांबी एक सेंटीमीटर ते 11.5 सेंटीमीटर आहे. खडकाचे हे तुकडे लहान खड्ड्यांच्या कडा, उतार विखुरलेले आढळले. यापैकी एकाही खडकाचा व्यास दोन मीटरपेक्षा जास्त नाही.

चंद्रासंदर्भात यावर्षाच्या सुरुवातीला मिळालेल्या माहितीचे सादरीकरण इंटरनॅशनल कॉन्फरंस ऑन प्लेनेट्स, एक्सप्लोनेंट्स एंड हॅबीटॅलिटीमध्ये करण्यात आले होते. शास्त्रज्ञांना चंद्रयान-3 (Chandrayaan 3 ) च्या संशोधनातून वेगवेगळी माहिती मिळत आहे. प्रग्यान रोवर शिवशक्ती प्वाइंटच्या 39 मीटर पुढे गेला आहे. त्या ठिकाणी त्याला जे खडक मिळाले आहे, त्याचा आकारही खूप मोठा आहे. शिवशक्ती पॉइंटच्या पश्चिमेला सुमारे दहा मीटर व्यासाचा खड्डा आहे. हा खड्डा या ठिकाणी असलेल्या खडकांचा उगम असू शकतो. यामुळे आजूबाजूच्या भागात खडकांचे पुनर्वितरण झाले असेल किंवा कालांतराने ते तिथेच गाडले गेले.

(हेही वाचा- Mumbai Local Train : रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! मुसळधार पावसातही आता लोकल वेगाने धावणार)

पुढील चंद्रयान मिशन चंद्रयान-4 ची अंतिम योजना तयार

चांद्रयान-३ मोहिमेत इस्त्रोला मोठे यश मिळाले. त्यानंतर इस्रो आता एका नव्या मोहिमेला सुरुवात करत आहेत. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले की, भारताने पुढील चंद्रयान मिशन चंद्रयान-4 (Chandrayaan 4 ) ची अंतिम योजना तयार केली आहे. ज्यामध्ये महत्त्वाचे स्पेस डॉकिंग स्टेशन आणि नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल (NGLV) समाविष्ट आहे. ही योजना आता मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. (Chandrayaan 3 )

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.