- ऋजुता लुकतुके
अफगाणिस्तानच्या संघाने यंदाच्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत उपान्त्य फेरीत धडक दिली. आणि या कामगिरीतून देशात खरी प्रेरणा कुणाला मिळाली असेल तर ती अफगाण महिला क्रिकेट संघाला. पुरुषांचा संघ क्रिकेट खेळू शकतोय. पण, महिलांची परवड सुरूच आहे याकडे महिला संघाने लक्ष वेधलं आहे. ऑस्ट्रेलियात आश्रित संघ म्हणून आयसीसी मान्यता मिळावी अशी विनंती अफगाण महिला संघाने केली आहे. (Afghanistan Women’s Cricket Team)
ऑस्ट्रेलियात (Australia) राहणाऱ्या काही अफगाण महिलांनी आयसीसीला पत्र लिहून तशी विनंती केली आहे. २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबान राजवट लागू झाली. आणि महिलांवर पुन्हा निर्बंध आले. तेव्हाच्या अफगाणिस्तान क्रिकेट संघटनेशी संबंधित २४ महिलांनी तेव्हा अफगाणिस्तान देश सोडून ऑस्ट्रेलियाचा आश्रय घेतला होता. आणि तेव्हापासून या महिलांची मागणी आहे की, त्यांना आश्रितांचा संघ म्हणून मान्यता मिळावी. (Afghanistan Women’s Cricket Team)
(हेही वाचा- Hathras Stampede : भोले बाबा कुठे गेले? शोधमोहिमेनंतर पोलीस म्हणाले…)
२०२३ मध्ये त्यांनी आयसीसीकडे अधिकृतपणे पहिली विनंती केली. पण, त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आयसीसीचा (ICC) एक नियम असं सांगतो की, कसोटीचा दर्जा मिळालेल्या सर्व देशांच्या महिला व पुरुष संघांना आयसीसी (ICC) सारखीच मदत करेल. पण, या बाबतीत आयसीसीने अफगाणि महिलांना अजून मान्यता दिलेली नाही. या महिला ऑस्ट्रेलियात स्थानिक क्रिकेट खेळत आहेत. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. (Afghanistan Women’s Cricket Team)
Former #Afghanistan women’s cricketers have sent an open letter to the @ICC asking them to support an Afghanistan Refugee team.
I’ve been very vocal on the plight of women in their home country and would urge the ICC to help those wishing to play in exile in any way possible. pic.twitter.com/8K1jZIcbFY
— James Buttler | Cricket Badger Podcast 🏏🦡🇺🇦 (@cricket_badger) July 1, 2024
‘आमच्या देशात पुरुषांचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो. पण, महिलांना ती परवानगी नाही. आम्ही महिला, देशाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही. त्यामुळे आमची आयसीसीला निकराची विनंती आहे की, ऑस्ट्रेलियातील (Australia) आश्रित संघ म्हणून आम्हाला मान्यता दयावी,’ असं या महिलांनी आयसीसीला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. (Afghanistan Women’s Cricket Team)
(हेही वाचा- Sangli Poshan Aahar : गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात आढळला मृत साप!)
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याविषयी आपली भूमिका आधीच जाहीर केली आहे. अफगाणिस्तानमधील लिंगभेदाला विरोध करत अफगाण महिलांच्या बाजूने उभं राहण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय आहे. म्हणूनच त्यांनी या महिलांना देशात प्रवेश दिला. आणि त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगीही मिळाली आहे. (Afghanistan Women’s Cricket Team)