Devendra Fadnavis: लोकसभेत मताधिक्य घटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश, म्हणाले…

193
Monsoon Session : छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या धर्तीवर "अर्बन नक्सल" रोखण्यासाठी नवीन कायदा

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्व पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. यंदाच्या विधानसभेत चांगली कामगिरी करता यावी, यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. जागावाटप, युती गणित, उमेदवारांची निवड यांसह विविध विषयांवर पक्षांतर्गत चर्चा सुरु आहेत. त्यातच आता भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, असे आदेश दिले आहेत.

आगामी विधानसभेच्या तयारीला लागा…

आता भाजपने विधानसभेसाठी कंबर कसली आहे. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नुकतंच भाजपची एससी आणि एसटी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. भाजपला लोकसभेत एससी आणि एसटी मतांचा मोठा फटका बसला होता. विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात नरेटिव्ह करण्यात आले, असा आरोप सातत्याने पाहायला मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. एससी आणि एसटी या भाजपच्या आघाड्यांसोबत देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आगामी विधानसभेच्या तयारीला लागा, असे आदेश त्यांना दिले. (Devendra Fadnavis)

विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका

विरोधकांचे नरेटिव्ह खोडून काढण्यात आपण अपयशी ठरलो. त्यामुळे विधानसभेत अशाप्रकारे जर नरेटिव्ह आले, तर आपण त्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे, अशी सूचनाही या बैठकीत करण्यात आली. तसेच विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.