अभियांत्रिकी (Engineering) शिक्षण म्हणजे अभियांत्रिकीच्या व्यावसायिक पद्धतीचे ज्ञान आणि तत्त्वे शिकवण्याची क्रिया. यात प्रारंभिक शिक्षण (स्नातक आणि/किंवा पदव्युत्तर पदवी) आणि त्यानंतर येणारे कोणतेही प्रगत शिक्षण आणि विशेषीकरण समाविष्ट आहे. भारतातील ५ हजारांहून अधिक विद्यापीठे आणि अभियांत्रिकी महाविद्यालये अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रदान करतात. (Best Engineering Colleges In Maharashtra)
इंजिनियर्सवरुन सोशल मीडियावर कितीही जोक्स फिरत असले तरी हे एक चांगले करिअर आहे. मात्र योग्य कॉलेज आणि भविष्याबद्दल योग्य दृष्टीकोन असायला हवा. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील टॉप ५ इंजिनियरिंग कॉलेजची माहिती देणार आहोत. जेणेकरुन तुमच्या करिअरला एक योग्य दिशा मिळेल. तर जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये कोणते इंजिनियरिंग कॉलेज आहेत टॉप ५ : (Best Engineering Colleges In Maharashtra)
१. आयआयटी बॉम्बे :
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) नुसार मुंबई येथे स्थित, आयआयटी बॉम्बे हे विद्यापीठ भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. विविध प्रकारचे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रम येथे दिले जातात.
बीई/बी.टेक साठी पहिल्या वर्षाची फी रु. २,३०,५५० आहे आणि सरासरी प्लेसमेंट पॅकेज सुमारे रु. ३.६७ कोटी एवढे आहे.
२. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबई :
शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी ओळखले जाणारे, ICT हे विद्यापीठ महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रु. १,९२,००० एवढे एकूण अभ्यासक्रम शुल्क असून एमई/एम.टेक अभ्यासक्रम प्रदान केला जातो
सरासरी प्लेसमेंट पॅकेज अंदाजे रु. १७ लाख आहे.
(हेही वाचा – Tropical Cyclone Nivar : जाणून घ्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळ ’निवार’ चा चित्तथरारक इतिहास)
३. जिओ इन्स्टिट्यूट, नवी मुंबई :
हे विद्यापीठ तुलनेने नवीन असले तरी, जिओ इन्स्टिट्यूट इंजिनीअरिंगमध्ये पीजी प्रमाणपत्र देते आणि इथला शैक्षणिक दर्जाही उत्कृष्ट आहे.
अभ्यासक्रमासाठी एकूण शुल्क रु. ९,७५,००० आहे.
सरासरी प्लेसमेंट पॅकेज सुमारे रु. २४ लाख आहे.
४. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे (COEP) :
COEP, महाराष्ट्रातील सर्वात जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहे आणि विशेष म्हणजे शिक्षणाचं माहेरघर म्हणजे आपल्या पुण्यात हे कॉलेज स्थित आहे.
बीई/बी.टेक साठी प्रथम वर्षाचे शुल्क रु. १,३५,२०० आहे.
उत्कृष्ट प्लेसमेंट संधी म्हणजेच रु. ३९.२ लाखाचे सरासरी पॅकेज मिळते.
५. विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT), नागपूर :
नागपुरात स्थित, VNIT आपल्या दर्जेदार आणि उत्कृष्ट अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.
बीई/बी.टेक साठी प्रथम वर्षाचे शुल्क आहे रु. १,५१,२००.
तसेच इथे प्लेसमेंट पॅकेजही चांगले आहे आणि विशेष म्हणजे प्रॅक्टिकल ज्ञानावर इथे भर दिला जातो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community