Veer Savarkar : वीर सावरकर साहस दिनानिमित्त युवकांच्या मनातील उलगडणार अंतरंग

वक्तृत्व स्पर्धामध्ये सहभाग घेणाऱ्यांसाठी १. देशप्रेम कृतीतून कसे व्यक्त करता?, २. माझे आदर्श (सामाजिक) व्यक्तिमत्व ! आणि ३. मतदानाची आवश्यकता असे हे विषय आहेत. तर निबंध स्पर्धामध्ये १. विश्वगुरू होण्याकडे भारताची वाटचाल, २. भारतीय इतिहासाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि ३. स्वा. सावरकरांनी केलेले जातीनिर्मूलन हे विषय आहेत.

183

८ जुलै १९१० ला विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांनी जीवाची पर्वा न करता मार्सेलीसच्या समुद्रात उडी घेतली आणि एका अलौकिक साहसाची प्रेरणाच समस्त जगाला दिली, म्हणूनच हा दिवस आपण साहस दिन म्हणून साजरा करतो. त्यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेने डोंबिवलीच्या युवकांसाठी एक अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. ‘अंतरंग युवापिढीचे’ असे या स्पर्धेचे नाव आहे. या साहस दिनानिमित्ताने स्पर्धकांना कोणते  साहस करायचे नाही, परंतु देशप्रेम शब्दरूपात लिहायचे आहे आणि बोलून दाखवायचे आहे. जेणेकरून आजच्या युवापिढीच्या मनात काय चालले आहे, याचा या स्पर्धेच्या निमित्ताने उलगडा होणार आहे.

दोन गटामध्ये ही स्पर्धा विभागली आहे. त्यात गट १ मध्ये १२ ते १८ वयोगटातील मुले आणि गट २ मध्ये १९ ते २५ वयोगटातील मुले असतील. स्पर्धक त्यांचे विचार मराठी/ हिंदी/ इंग्रजी यांपैकी कोणत्याही एका भाषेची निवड करून लिहू शकतात. वक्तृत्व स्पर्धामध्ये सहभाग घेणाऱ्यांसाठी १. देशप्रेम कृतीतून कसे व्यक्त करता?, २. माझे आदर्श (सामाजिक) व्यक्तिमत्व ! आणि ३. मतदानाची आवश्यकता असे हे विषय आहेत. तर निबंध स्पर्धामध्ये १. विश्वगुरू होण्याकडे भारताची वाटचाल, २. भारतीय इतिहासाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि ३. स्वा. सावरकरांनी केलेले जातीनिर्मूलन हे विषय आहेत.

(हेही वाचा धर्मांतरामुळे हिंदू अल्पसंख्यांक होतील; Allahabad High Court ने व्यक्त केली चिंता)

स्पर्धेसाठी नियमावली व अटी

  • डोंबिवली येथे राहणाऱ्या युवकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
  • वकृत्व स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांनी आपले चलचित्र (व्हिडिओ) पुढे देण्यात आलेल्या what’sapp क्रमांकावर पाठवावे.
  • चलचित्राचा कमाल कालावधी केवळ ५ मिनिटांचा असावा.
  • ५ मिनिट हून अधिक कालावधीचे चलचित्र स्वीकारले जाणार नाही, याची विशेष नोंद घ्यावी.
  • चलचित्र पाठवताना त्यात सुरुवातीला आपला परिचय अगदी थोडक्यात म्हणजेच नाव, वय, शिक्षण व राहण्याचे ठिकाण इतकाच द्यावा.
  • निबंध स्पर्धेसाठी शब्दमर्यादा अंदाजे कमाल ३०० शब्द एवढी असेल, अधिक मोठाले निबंध स्पर्धेतून बाद करण्यात येतील
  • निबंधाला सुरवात करण्याआधीच आपले नाव, वय शिक्षण, संपर्क क्रमांक आणि राहण्याचे ठिकाण यांची नोंद करायची आहे.
  • निबंध टंकलिखित (टाईप)करून पुढे देण्यात आलेल्या ईमेल आयडी वर पाठवावा.
  • दोन्ही माध्यमातून स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी ४ जुलै, २०२४(रात्री १० पर्यंत) ही चलचित्र/निबंध पाठवण्याची अंतिम दिनांक व वेळ आहे.
  • स्पर्धकांनी आपले चलचित्र/ निबंध हे व्यवस्थित तपासून व अंतिम करून एकदाच पाठवावेत. कोणत्याही परिस्थितीत
  • सुधारित म्हणून पाठवलेले चलचित्र/निबंध पुन्हा स्वीकारले जाणार नाहीत.
  • आपला चलचित्र/निबंध मिळाल्याची खात्री आपणाला संदेश पाठवून देण्यात येईल. त्यासाठी संपर्क करू नये.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
  • पारितोषिक समारंभाच्याच दिवशी विजेत्यांची घोषणा केली जाईल. त्यामुळे स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांची उपस्थिती त्यादिवशी अनिवार्य आहे. तसेच या समारंभासाठी सर्वानाच प्रवेश खुला असेल.

स्पर्धेचे आकर्षण

  • विजेत्यांना पारितोषिके रोख रक्कम स्वरूपात
  • सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला प्रशस्तीपत्रक
  • प्रवेश विनामूल्य
  • पारितोषिक समारंभ ६ जुलै, २०२४ रोजी होणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.