मुंबईतील रुग्णसंख्या मागील चार दिवसांपासून नियंत्रणात शनिवारी संपूर्ण दिवसभरात जिथे ८६६ रुग्णांची नोंद झाली होती, तिथे सोमवारी ७२८ रुग्ण आढळून आले. संपूर्ण दिवसभरात २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
२२ रुग्णांचा मृत्यू!
सोमवारी संपूर्ण दिवसभरात ९८० रुग्ण बरे होवून घरी परतले. तर संपूर्ण दिवसभरात २८ हजार ०७३ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर सोमवारीपर्यंत १५ हजार ७८३ रुग्णांवर उपचार सरु आहेत. शनिवारी जिथे २९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तिथे सोमवारी २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २२ रुग्ण हे दीर्घकालिन आजाराचे आहेत. यामध्ये १२ पुरुष आणि १६ महिला रुग्णांचा समावेश होता. यामध्ये ६० वर्षांवरील १७ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ११ एवढी होती. सोमवारी, ७ जूनपासून मुंबईत अनलॉकला सुरु झाले, अशा वेळी रुग्ण संख्या कमी होत आहे, हे सकारात्मक बाब आहे.
(हेही वाचा : कोरोनामुक्त गावासाठी जागरुकता निर्माण करा! मुख्यमंत्र्यांचे आवाहन)
रुग्ण दुपटीचा दर ५५० दिवसांवर आला!
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ५५० दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ९६ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या ही २६ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community