Paris Olympic 2024 : ज्योती याराजीला १०० मीटर अडथळ्यांच्या स्पर्धेत ऑलिम्पिक पात्रता

Paris Olympic 2024 : भारताकडून १०० मीटर अडथळ्यांची शर्यत खेळणारी ज्योती पहिली धावपटू असेल 

115
Paris Olympic 2024 : ज्योती याराजीला १०० मीटर अडथळ्यांच्या स्पर्धेत ऑलिम्पिक पात्रता
Paris Olympic 2024 : ज्योती याराजीला १०० मीटर अडथळ्यांच्या स्पर्धेत ऑलिम्पिक पात्रता
  • ऋजुता लुकतुके 

ज्योती यराजी (Jyothi Yarraji) ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर अडथळ्यांची शर्यत खेळणारी पहिली भारतीय ॲथलीट ठरणार आहे. तिच्या क्रमवारीच्या आधारे ती आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. जागतिक ॲथलेटिक्स संघटनेनं मंगळवारी सर्व प्रकारच्या ॲथलेटिक्स प्रकारात पात्र ठरलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. संघटनेचे पात्रता निकष दोन प्रकारचे होते. एकतर ज्यांनी प्रत्येक प्रकारात कामगिरीचा ठरवून दिलेला निकष पार केला असेल तर. किंवा ज्यांनी जागतिक क्रमवारीत वरचं स्थान मिळवलं असेल तर त्यांचाही विचार आंतरराष्ट्रीय संघटनेनं ऑलिम्पिक पात्रतेसाठी केला आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- CM Ladki Bahin Yojna: ‘त्या’ मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा; प्रकाश महाजन यांची मागणी)

ज्योती (Jyothi Yarraji) क्रमवारीच्या निकषावर ऑलिम्पिक खेळू शकणार आहे. पण, तिच्या पॅरिसच्या वारीत एक अडथळा आहे तो भारतीय ॲथलेटिक्स संघटनेचा. कारण, ज्या खेळाडूंची निवड क्रमवारीच्या निकषावर होते, त्यांना पाठवायचं की नाही, किंवा त्या जागी कुणाला पाठवायचं याचा अंतिम निर्णय त्या त्या देशाची संघटना घेत असते. त्यामुळे भारतीय संघटनेला याविषयी अंतिम निर्णय घेण्यासाठी अजून दोन दिवस आहेत. भारतीय संघटना हा कोटा नाकारूही शकते. (Paris Olympic 2024)

अर्थात, तशी शक्यता खूपच कमी आहे. कारण, १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योती याराजीच भारताची अव्वल खेळाडू आहे. याचवर्षी मे महिन्यात फिनलंड (Finland) इथं झालेल्या स्पर्धेत याराजीने १२.७८ सेकंदांची वेळ नोंदवली होती. ऑलिम्पिक पात्रता निकषापेक्षा ती फक्त एक शतांश सेकंदांनी कमी पडली होती.  (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Veer Savarkar : वीर सावरकर साहस दिनानिमित्त युवकांच्या मनातील उलगडणार अंतरंग)

सध्या जागतिक क्रमवारीत या प्रकारात ती ३४ व्या क्रमांकावर आहे. एकूण ४० खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार असल्यामुळे तिला क्रमवारीच्या आधारावर संधी मिळणार आहे. लांब उडी ॲथलीट जस्विन ऑल्ड्रिनची पॅरिस पात्रता थोडक्यात हुकली आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.