Parliament Session : …आणि सुषमा स्वराज यांची आठवण आली

190
Parliament Session : ...आणि सुषमा स्वराज यांची आठवण आली
  • वंदना बर्वे

अगदी निगर्वी व्यक्तिमत्व असलेल्या भाजपाच्या ज्येष्ठ दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांना भारतीय राजकारणात कुणीही विसरणे शक्य नाही. त्यांची चापून चोपून नेसलेली साडी असो वा कपाळावरील मोठी टिकली असो… आपण हिंदू असल्याचा अभिमान त्यांच्या व्यक्तिमत्वाला बघून प्रत्येक भारतीय स्त्रीला वाटला नसेल तर नवलच. त्यांचे प्रभावित करणारे भाषण आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्याच भाषणाची आठवण त्यांची मुलगी खासदार बासुंरी स्वराज यांनी यावेळी लोकसभा अधिवेशनात करून दिली. त्यांच्या भाषणानंतर प्रत्येक जण त्यांना भेटून सुषमा स्वराज यांची आठवण झाल्याचे लोकसभा आवारात सांगत असल्याचे दिसत होते. (Parliament Session)

बांसुरी स्वराज यांनी सुषमा स्वराज यांच्या बोलण्याच्या स्टाईलमध्येच जोरदार भाषण करत सरकारची प्रशंसा केली. तर विरोधकांवर प्रहार देखील केले. त्यांची शब्दफेक, हातवारे करण्याची पद्धत, हिंदीवर असलेले प्रभुत्व, विरोधकांकडे पाहण्याची, टीका करण्याची स्टाईल सुषमा स्वराज यांची आठवण करून देत होती. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बांसुरी स्वराज यांचे भाषण झाले. त्या पहिल्यांदाच लोकसभेत निवडून आल्या आहेत. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. त्यांनी आपल्या आईप्रमाणेच संस्कृतमध्ये सदस्यत्वाची शपथ घेत जुन्या आठवणी ताज्या केल्या होत्या. (Parliament Session)

लोकसभेतील बहुतेक सदस्यांना सोमवारी १ जुलैला भाजपाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची आठवण झाली असेल. आपल्या भाषणाने त्या सभागृह दणाणून सोडत होत्या. तसेच दमदार भाषण सोमवारी त्यांच्या कन्या खासदार बांसुरी स्वराज यांनी लोकसभेत केले. भाषणापासून ते साडी नेसण्याच्या स्टाईलपर्यंत त्या आपल्या आईप्रमाणेच भासतात. त्याचे झलक लोकसभेत सोमवारी पाहायला मिळाली. देशात पहिल्यांदाच असे सरकार आले आहे, ज्या सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला आहे, असे सांगत त्यांनी मोदी सरकारने मागील दहा वर्षात केलेल्या कामांचा पाढाच वाचला. (Parliament Session)

(हेही वाचा – Jagdeep Dhankhad: विरोधकांचा सभात्याग! सभापती म्हणाले, “विरोधक सभागृह सोडून नाहीत, संविधानाला…”)

बांसुरी स्वराज यांनी लोकसभेत बोलण्यासाठी सुरूवात करताच काही क्षण सुषमा स्वराज यांची आठवण अनेक सदस्यांना झाली असेल. आईसारखेच हावभाव आणि हातवारे करत त्यांनी आपल्या सरकारवर स्तुतीसुमने उधळली तर विरोधकांना हल्लाबोल केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषमावरील धन्यवाद प्रस्तावावर बांसुरी स्वराज यांचे भाषण झाले. त्या पहिल्यांदाच लोकसभेत निवडून आल्या आहेत. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. त्यांनी आपल्या आईप्रमाणेच संस्कृतमध्ये सदस्यत्वाची शपथ घेत जुन्या आठवणी ताज्या केल्या होत्या. (Parliament Session)

भाजपाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचं निधन कर्करोगाने झालं होतं. सुषमा स्वराज या त्यांच्या अमोघ वक्तृत्वासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांची अभ्यासपूर्ण शैली आणि तडाखेबंद भाषण यामुळे त्या कायमच चर्चेत राहिल्या. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्या केंद्रीय मंत्रीही होत्या. बासुरी स्वराज या नवी दिल्लीतून लोकसभेच्या सदस्या आहेत. बन्सुरी स्वराज या माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि मिझोरामचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांच्या कन्या आहेत. गेल्या वर्षी, त्या दिल्ली राज्याच्या कायदा सेलच्या राज्य समन्वयक बनल्या. गेल्या वर्षी २६ मार्च रोजी बन्सुरी स्वराज यांना भाजपने दिल्ली राज्याच्या कायदा कक्षाचे राज्य सहसंयोजक बनवले होते. त्यानंतर आता त्यांच्या खांद्यावर लोकसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी आली आहे. नवी दिल्ली सीट ही दिल्लीच्या खास जागांपैकी एक आहे. (Parliament Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.