Pohe Recipe in Marathi : कांदे पोहे बनवायचे आहेत… ‘ही’ आहे सोपी रेसिपी

116
Pohe Recipe in Marathi : कांदे पोहे बनवायचे आहेत... 'ही' आहे सोपी रेसिपी
Pohe Recipe in Marathi : कांदे पोहे बनवायचे आहेत... 'ही' आहे सोपी रेसिपी
कांदे पोहे (Kande Pohe) म्हणजे अख्या महाराष्ट्राची सर्वात आवडती न्याहारी. न्याहारी मध्ये पोहे असले तर कोणीच न्याहारीला नाही म्हणणार नाही. आणि सोबत जर गरमागरम चहाचा कप असला तर बातच काही निराळी! मग वेळ कशाला घालवायचा, चला तर बनवूया मस्त असे कांदे पोहे. (Pohe Recipe in Marathi)

साहित्य

४ मुठी जाडे पोहे
१ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप मटार
२ हिरव्या मिरच्या
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
३-४ कढीपत्ता पाने (optional )
१ टेबलस्पून ओलं खोबरं
१ १/४ टीस्पून साखर
१ टेबलस्पून कोथिंबीर
२ टीस्पून लिंबूरस
मीठ चवीप्रमाणे

कृती

1. सर्वप्रथम आपल्याला झाडे पोहे घेऊन ते पाण्याने भिजवून घ्यायचे आहे. यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे एका चाळणीत पोहे घेऊन त्यावर हलकं पाणी सोडून पोहे भिजवून घ्या. अशा पद्धतीने पोहे भिजल्यावर पोहे खूप गिलगिल असे अती भिजणार पण नाहीत आणि अतिरिक्त पाणी जे आहे ते पण निघून जाईल.

2. प्रथम पोहे चाळणीत टाकून हलक्या पाण्याने भिजवून घ्या आणि बाजूला ठेऊन द्या.

3. आता आपल्याला बाकी साहित्याची तयारी करायची आहे. तर त्यासाठी एक माध्यम आकाराचा कांदा घेऊन त्याचे बारीक पण लांब असे काप करून घ्या. तसेच तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचे बारीक किंवा हलके मध्यम आकाराचे काम करून घ्या. बटाटा आपल्याला कच्चा घ्यायचा आहे. कच्चा बटाटा सोलून म्हणजेच त्याचे साल काढून त्याचे बारीक किंवा मध्यम तुमच्या आवडीप्रमाणे असे छान तुकडे करून घ्या. लक्षात असू द्या तुकडे केलेले बटाटे आपल्याला पाण्यात टाकून ठेवावे लागेल नाहीतर त्याचा रंग बदलतो.

4. आता आपण मुख्य पाककृतीकडे वळूया. गॅसवर एक कढई ठेवून त्यात दोन ते तीन चमचे तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यामध्ये थोडे जिरे, मोहरी, हिंग आणि हिरवी मिरची टाकून परतवून घ्या. आता त्यामध्ये कापलेले कांदे आणि बटाटे घालून परतवून घ्या. आपण कांदे आणि बटाटे सोबतच टाकतो आहे कारण आपल्याला कांदे आणि बटाटे दोन्हीही २/३ शिजवून घ्यायचे आहे. उरलेले १/३ कांदे आणि बटाटे हे पोह्यांसोबत शिजून जातील. (Pohe Recipe in Marathi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.