- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने शनिवारी टी-२० विश्वचषक जिंकला आणि त्याच संध्याकाळी बार्बाडोसमध्ये सुरू झालेला पाऊस नंतर तीन दिवस थांबलाच नाही. बेरिल चक्रीवादळाने बार्बाडोसला घेरलं. तिथली वाहतूक आणि विमानसेवाही बंद झाली. त्यामुळे मागचे तीन दिवस भारतीय संघ तिथल्या हॉटेलमध्ये नैसर्गिक लॉकडाऊनमध्ये होता. अखेर बुधवारी स्थानिक वेळ सकाळी पाच वाजता भारतीय संघ विशेष चार्टर्ड विमानातून भारताकडे रवाना झाला आहे. (T20 World Cup, India Champion)
बीसीसीआयने खेळाडू, पदाधिकारी, सपोर्ट स्टाफ आणि तिथे अडकलेले पत्रकार यांच्यासाठी एअर इंडियाच्या विशेष चार्टर्ड विमानाची सोय केली आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजू २० मिनिटांनी हे विमान नवी दिल्लीत उतरेल. तिथे खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत आणि त्यांना भेटून संघ मुंबईला परतेल. मुंबईत बीसीसीआयने खेळाडूंसाठी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअम अशी मिरवणूक काढली आहे आणि वानखेडे मैदानात खेळाडूंचा सत्कार समारंभही होणार आहे. (T20 World Cup, India Champion)
It’s coming home 🏆#TeamIndia pic.twitter.com/Pxx4KGASb8
— BCCI (@BCCI) July 3, 2024
(हेही वाचा – Parliament Session : …आणि सुषमा स्वराज यांची आठवण आली)
बीसीसीआयने काही वेळापूर्वीच एका ट्विटमध्ये टी-२० विश्वचषक करंडकाचा फोटो ट्विट केला आहे आणि ‘तो घरी येतोय,’ असा मथला या फोटोला दिला आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनीही चषक घेऊन विमानात चढतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे. विमानातही खेळाडूंचं फोटोसेशन सुरूच होतं. (T20 World Cup, India Champion)
Coming home 🇮🇳🏆 pic.twitter.com/uJ3QjcEF2k
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) July 3, 2024
एअर इंडियाचा बोईंग ७७७ प्रजातीचं विमान २ जुलैला बार्बाडोसमध्ये लँड झालं होतं. पहाटे दोन वाजता विमान तिथल्या ग्रँटली ॲडम्स विमानतळावर पोहोचलं. तिथल्या विमानतळावर इतक्या मोठ्या विमानाची सोय नाहीए. त्यामुळे पुन्हा उड्डाणासाठी तयार व्हायला तसंच इंधनाची सोय व्हायला काही काळ जावा लागला आणि वादळही तोपर्यंत शमलं नव्हतं. आधी भारतीय संघ २ तारखेलाच रात्री भारतात परतणार होता. पण, ही सगळी सोय झाल्यावर आता ३ तारखेला संघाने बार्बाडोसमधून उड्डाण केलं आहे. (T20 World Cup, India Champion)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community