जगातील अनेक देशांमध्ये मुस्लिम डॉक्टर असोसिएशनची स्थापना झाली आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये मुस्लिम डॉक्टरांनी स्वतःची संघटना स्थापन केली आहे, ज्यामध्ये बडोदा, गुजरातमध्ये बडोदा मुस्लिम डॉक्टर्स असोसिएशनचा स्वतःचा लोगो आहे ज्यात मशिदीचा मिनार आहे. या संघटनेत सहभागी झालेल्या मुस्लिम डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णालयाबाहेर वडोदरा मुस्लिम (Muslim) डॉक्टर असोसिएशनचा लोगो लावला आहे.
मुसलमान रुग्णांना प्राधान्य द्या
या संघटनेतील डॉक्टरांच्या अनेकदा बैठका होतात, ज्यात त्यांना मुस्लिम धर्मासाठी कोणते काम करायचे आहे, डॉक्टर असताना तुम्ही धर्माचा प्रचार कसा करू शकता, हे सांगितले जाते. मुस्लिम (Muslim) रुग्णांना सवलती द्याव्या लागतील, त्यांना प्राधान्याने उपचार करावे लागतील, असे सांगितले जाते. मुस्लिम वसाहतींमध्ये उपलब्ध असलेली रुग्णवाहिका त्यांच्यासाठी काम करते. तुम्ही कोणत्याही हिंदू डॉक्टर किंवा इंजिनियरला कोणत्याही हिंदू संघटनेत सामील होताना पाहिले आहे का?, पदवी मिळताच ते लगेच धर्मनिरपेक्ष होतात आणि स्वतःच्या धर्माकडे बोटे दाखवू लागतात.
(हेही वाचा Land Jihad : उत्तन येथील बालेशाह पीर दरगाह अतिक्रमणाची पाठराखण करणाऱ्या तहसीलदार, तलाठ्याच्या चौकशीचा आदेश)
डॉक्टरी पेशाच्या विरोधात
खरे तर डॉक्टरचा एकच धर्म असतो, तो म्हणजे मानवता. अस्वस्थ असलेला रुग्ण एखाद्या डॉक्टरकडे जातो, तेव्हा जसे रुग्ण डॉक्टरचा धर्म बघत नाही, तसे डॉक्टरही रुग्णाचा धर्म विचारत नाही. मानवतेच्या धर्मानुसार डॉक्टरने आधी त्याच्याकडे आलेल्या रुग्णाला तातडीने उपचार देऊन स्वस्थ करायचे असते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेल्या डॉक्टरांना तशी शपथ घ्यावी लागते. अशा वेळी मुस्लिम डॉक्टर असोसिएशन त्यांच्या डॉक्टरांना आधी मुसलमान रुग्णाला उपचारासाठी प्राधान्य द्या, मुस्लिम (Muslim) ज्या ठिकाणी राहतात तिथे रुग्णवाहिकेची सेवा पुरवावी, असे सांगत आहेत. हे डॉक्टरी पेशाच्या विरोधात आहे.
आयएमए गप्प का?
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) तातडीने त्या डॉक्टरांची नोंदणी रद्द करणार का, असा कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन यावर मौन बाळगून आहे. त्यामुळे आता जर कुठे हिंदू डॉक्टर्स असोसिएशनची स्थापना झाली, तर या देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात आली, म्हणून हे मुसलमान कांगावा करतील, त्यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन कारवाई करणार का, अशी विचारणा करण्यात येऊ लागली आहे.
Join Our WhatsApp Community