BMC : महापालिकेचे शंभरहून अधिक सहायक अभियंता हे बढतीच्या प्रतीक्षेत ?

2817
BMC : सोमवारची सुट्टी बदलल्याने रजेवर गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच
BMC : सोमवारची सुट्टी बदलल्याने रजेवर गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच

मुंबई महापालिकेतील सहायक अभियंता पदी असलेल्या अभियंत्यांना बढतीसाठी पात्र होऊनही अद्याप कार्यकारी अभियंतापदी पदोन्नतीच्या लाभापासून वंचित राहत आहे. कार्यकारी अभियंता पदासाठी पात्र असूनही बढती मिळत नसल्याने अभियंत्यांचा आकडा आता वाढत जात असून तब्बल १०० हून अधिक सहायक अभियंता हे कार्यकारी अभियंत्यांच्या बढतीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, महापालिका प्रशासन याबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याने अभियंत्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. (BMC)

मुंबई महापालिकेतील सहायक अभियंतापदी असलेल्या अभियंत्यांना ठराविक सेवा कालावधीनंतर कार्यकारी अभियंतापदीसाठी पात्र ठरतात. परंतु सहायक अभियंतापदाचा बढतीसाठी आवश्यक कालावधी पूर्ण केल्यानंतरही तब्बल शंभरहून अधिक अभियंते हे प्रतीक्षेत असल्याने यासर्व अभियंत्यांकडून वारंवार विनंती करूनही प्रशासनाकडून कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही. (BMC)

(हेही पहा – वनांचे, पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या गावकऱ्यांच्या सरकार पाठीशी; Sudhir Mungantiwar यांची विधासभेत ग्वाही)

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अमित सैनी यांची नियुक्ती झाली असून त्यानंतर अद्यापही त्यांनी अभियंत्यांच्या पदोन्नतीसाठी एकही बैठक घेतलेली नाही. तसेच अभियंत्याचा कारभार सांभाळणाऱ्या नगर अभियंता विभागाचा कार्यभारही अद्याप समजून घेतलेला नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त सैनी यांच्याकडून याबाबत कोणतीही बैठक आणि त्याबाबत निर्णय घेतला जात नसल्याने अभियंत्यांमधील नाराजी आता वाढत चालली असून एकप्रकारे पदोन्नतीचा लाभ मिळत नसल्याने असंतोष पसरलेला दिसून येत आहे. त्यामुळे सहायक अभियंते हे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असून प्रशासन याबाबत कधी निर्णय घेणार असा सवाल अभियंत्यांकडून केला जात आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.