CM Majhi Ladki Bahin Yojna : दलाल खपवून घेतले जाणार नाहीत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

157
Vidhan Parishd Election Result : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनितीवर शिक्कामोर्तब !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा अर्ज भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिला. (CM Majhi Ladki Bahin Yojna)

राज्य सरकारने आपल्या सन २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना महिना १ हजार ५०० रुपये दिले जाणार आहेत. योजना जाहीर होताच तलाठी, तहसीलदार कार्यालयात आवश्यक दाखले काढण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. तसेच काही ठिकाणी आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी दलाल सक्रिय झाल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी योजनेच्या पारदर्शी अंमलबजावणीबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. (CM Majhi Ladki Bahin Yojna)

(हेही वाचा – Hindusthan Post Impact : बोरीवली स्कायवॉकच्या दुसऱ्या जिन्याचीही दुरुस्ती; नागरिकांना उर्वरीत जिन्यांच्या दुरुस्तीची प्रतीक्षा?)

योजनेच्या नोंदणीसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देणे तसेच त्यानंतर योजनेचा अर्ज भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात मंगळवारी विधानभवनात एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. (CM Majhi Ladki Bahin Yojna)

माता-भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या विविध योजना राज्य सरकारने आणल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढण्यात आला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने चोख नियोजन करावे. लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सक्त सूचना शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (CM Majhi Ladki Bahin Yojna)

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.