८ जुलै, २०२४ रोजी असलेल्या ११४ व्या वीर सावरकर (Veer Savarkar) साहस दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या डोंबिवली शाखेच्या वतीने सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांच्यासोबत स्वा. सावरकर यांच्या विषयावर विशेष चर्चासत्र आणि मुक्तसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
(हेही वाचा Land Jihad : उत्तन येथील बालेशाह पीर दरगाह अतिक्रमणाची पाठराखण करणाऱ्या तहसीलदार, तलाठ्याच्या चौकशीचा आदेश)
हा कार्यक्रम ६ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता वक्रतुंड सभागृह, तिसरा मजला, गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. आपल्या घरातील तरुण-तरुणींना देखील या चर्चासत्रात सहभागी करून घ्या. स्वा. सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर केल्या जाणाऱ्या खोट्या आरोपांचे पुराव्यासह खंडन, तसेच सावरकरांनी मांडलेल्या हिंदुत्वाची खरी परिभाषा, आजच्या काळात सावरकर विचारांचे महत्त्व अश्या अनेक विषयांवर सोप्या भाषेत विश्लेषण हे या परीसंवादाचे वैशिष्ट्य आहे. तरी डोंबिवलीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सर्वांनी नक्की या चर्चासत्रात सहभागी व्हावे. तसेच डोंबिवलीत युवापिढीसाठी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘अंतरंग युवापिढीचे’ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभही याच वेळी करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community